ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

गोकुळ गितेंमुळे वाढली महायुतीची डोकेदुखी:जाहीर पाठींबा देण्यास स्पष्ट नकार; तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत, महाजन नाशकात

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गोकुळ गिते यांच्या बंडखोरीमुळे सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत नाशकात तळ ठोकून आहेत. हे दोन्ही नेते गोकुळ गिते यांचा जाहीर पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गोकुळ गिते यांनी निवडणूक खूप पुढे गेल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठींबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. यामुळे महाजन व सामंत यांची गोची झाली आहे. महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेची जागा सत्ताधारी शिवसेनेला सुटली आहे. प्रारंभी गोकुळ गिते यांचे बंधू तथा भाजप नेते गणेश गिते यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली. पण गुरुवारी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. पण गोकुळ यांनी मात्र आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे या मतदारसंघात गोकुळ गिते यांचा सामना महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे तथा अन्य एक उमेदवार प्रसाद हिरे यांच्याशी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे आता मंत्री उदय सामंत व गिरीश महाजन हे आता गोकुळ गिते यांचा पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गोकुळ गिते यांनी पाठींबा देण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्यावर कुणीही दबाव आणू नये गोकुळ गिते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आता निवडणूक खूप पुढे गेली आहे. समोरच्या उमेदवाराच्या (नरेंद्र दराडे) मुलाने माझा बाप काढला. अर्वाच्च शब्दांत धमकी दिली. त्यामुळे मला उमेदवारी करणे क्रमप्राप्त आहे. महायुतीचा उमेदवार क्रियाशील नसून, निष्क्रिय आहेत या निष्क्रिय उमेदवारासाठी भाजप युतीचे नेते माझ्यावर दबाव आणत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी माझ्यावर दबाव आणू नये. माझा प्रचार सुरू झाला आहे. येथील सर्वाधिक नगरसेवक माझ्यासोबत येतील असा मला ठाम विश्वास आहे. आता निवडणूक खूप पुढे गेली नाशिकच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत येथे आलेत. माझा अद्याप कुणाशीही संपर्क झाला नाही. विशेषतः माझा कोणता गैरसमजही झाला नाही. मला माघार घ्यायची असती, तर ती कालच घेतली असती. समोरच्या उमेदवाराने माझ्या घरी येऊन मला विनंती केली असती, तर मी माघार घेण्याचा विचार केला असता. पण मला शिवीगाळ झाली. माझा बाप काढला गेला. त्यामुळे त्यांना जाहीर पाठींबा देण्याचा विषयच येत नाही. आता निवडणूक खूप पुढे गेली आहे. ही काही ग्राम पातळीवरची निवडणूक नाही, असे गोकुळ गिते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. गोकुळ गिते म्हणाले, मी भाजपचा बंडखोर नाही. माझे बंधू गणेश गिते भाजपचे सक्रिय नेते आहेत. भाजपचे लोक माझ्यावर का दबाव टाकत आहेत हे मला कळत नाही. नाशिकच्या निवडणुकीत माझ्यावर ओझर पिंपळगावची जबाबदारी होती. त्या ठिकाणी मी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. हे उमेदवार नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी कुठे होते? निवडणुकीत ते का दिसले नाही? त्यामुळे माझ्यावर कुणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. ही निवडणूक गणेश गिते यांनीच लढवावी असे सर्वांचे मत होते. पण महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. पण मी निवडणुकीवर ठाम आहे. माझा प्रचारही सुरू झाला आहे. हीच माझी रणनीती आहे. सर्वाधिक नगरसेवक माझ्यासोबत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर