ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शरद पवार खुर्चीवर अन् समोर दादा झोपलेले:अंत्यसंस्कार स्थळावरील सुन्न करणारे चित्र; दादांच्या निधनामुळे पवार कुटुंब कोलमडले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी एका विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होत आहेत. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शरद पवार यावेळी अत्यंत खिन्न मनाने अजित पवारांच्या पार्थिवाकडे पाहताना दिसून आले. अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यानतंर ते तेथून विद्या प्रतिष्ठानपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोकांचा जनसमुदाय जमला होता. अजित पवार यांचे पार्थि विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात उभारण्यात आईलेल्या चौथऱ्यावर आणण्यात आले त्यावेळी तिथे अत्यंत शोकाकुल वातावरण होते. अजित पवार यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य तिथे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी खाली ठेवले. शरद पवारांची दादांच्या पार्थिवावरून नजर हटेना त्यावेळी शरद पवार पार्थिवाच्या अगदी समोर बसले होते. ते अजित पवारांच्या पार्थिवाकडे एकटक पाहत होते. अजित पवार यांचा निपचित पडलेला मृतदेह व त्याकडे एकटक पाहणारे शरद पवार हे चित्र अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारे ठरले. शरद पवार यांनी वयोमानानुसार गत काही दिवसांपासून राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांनी आपल्या पक्षाचा प्रचार केला नव्हता. याच काळात राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण मध्येच पवार कुटुंबावर अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू पाहण्याची वेळ आली. अजित पवार हे पवार कुटुंबीयांचा आधारवड होते. ते शरद पवारांचा वारसा पुढे नेणार होते. पण आता अजित पवारांच्या निधनामुळे पवार कुटुंबाचा मुख्य आधारवडच कोसळला आहे. यामुळे सर्व कुटुंबीय सैरभैर झाले आहे. काल सकाळी झाले होते निधन उल्लेखनीय बाब म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात अकाली निधन झाले. बारामती येथील प्रचारसभेला जाणाऱ्या अजित पवारांच्या विमानाला विमानतळापासून अवघ्या 50 मीटर अंतरावरच अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यातून प्रवास करणाऱ्या अजित पवारांसह सर्वांचाच जागेवर मृत्यू झाला. त्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. आज त्यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होत आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील अनेक छोटेमोठे नेते उपस्थित आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर