ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पुसेगावात जमिनीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी:परस्पर तक्रारीवरून 12 जणांवर गुन्हे दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेगाव येथे जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून नरसी नामदेव पोलिसांनी गुरुवारी ता 4 दोन्ही गटांतील एकूण 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पुसेगांव येथील मनोहर नांदेडकर यांनी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ता 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मालमत्ता क्रमांक 1192 मधील जागेच्या कारणावरून आठ जणांनी बेकायदेशीर मंडळी जमवून त्यांना व साक्षीदारांना मारहाण केली. या प्रकरणी शेख अखिल, शेख कामिल, शेख अतीक, शेख फिरोज, शेख अजिम, शेख मजीद, शेख शौकत, शेख बाबू (सर्व रा. पुसेगाव) आणि रितेश तिवारी (रा. नरसी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूने मोहम्मद एहसानउल्लाह देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. 3 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास देशमुख हे त्यांच्या आईच्या मालकीची जमीन (गट क्र. 01, पुसेगाव) पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी ‘आम्ही विकत घेतलेल्या जमिनीची पाहणी का करता?’ असे म्हणून शिवराज नांदेडकर, सूरज नांदेडकर, ओंकार नांदेडकर आणि स्वतः मनोहर नांदेडकर यांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, सपोनि अशोक घारगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे . या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सपोनि घारगे करत असून, सध्या तरी कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी दोन पथके स्थापन केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर