ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सुप्रिया सुळेंचे व्याही भाजप आ.लखानींकडे पत्नीसह तब्बल 75कोटींहून अधिकची संपत्ती:पत्नीच्या नावेही 30 कोटी 99 लाख 162 रुपयांची मालमत्ता

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अरुण हनुमंत लखानी हे बिनविरोध निवडून आले आहेत. उद्योग क्षेत्रात सक्रिय असलेले लखानी हे कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल ४५ कोटी २८ लाख ३९ हजार १२८ रुपयांची चल मालमत्ता असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीच्या नावेही ३० कोटी ९९ लाख १६२ रुपयांची मालमत्ता असल्याने हे दांपत्य मिळून ७६ कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लखानी हे राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडे २४.३५ कोटींची संपत्ती नाशिकचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रातून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण जंगम व स्थावर मालमत्ता, बँक ठेवी आणि व्यावसायिक भागीदारी समोर आली असून एकूण कुटुंबीयांची संपत्ती २४ कोटी ३५ लाखांच्या घरात आहे. जंगम मालमत्ता नरेंद्र दराडे यांच्या नावावर ३ कोटी ४२ लाख ३६ हजार ३७४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची पत्नी सुरेखा दराडे यांच्याकडे ४ कोटी २९ लाख ९ हजार ४८३ रुपयांची आणि हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावे ९ लाख १८ हजार ७२० रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये टोयोटा फॉर्च्युनर कार, स्कूल बस आणि सोन्याच्या जडजवाहिरांचा समावेश आहे. स्थावर मालमत्ता चालू बाजारमूल्यामध्ये पत्नी सुरेखा दराडे या पतीपेक्षा श्रीमंत ठरल्या आहेत. नरेंद्र दराडे यांच्या नावे ६ कोटी ४६ लाख ८३ हजार २७५ रुपयांची शेतजमीन, बिगरशेती जमीन आणि इमारती आहेत, तर त्यांची पत्नी सुरेखा दराडे यांच्याकडे तब्बल १० कोटी १ लाख १५ हजार ५० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. कुटुंबाची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून नरेंद्र दराडे यांच्याकडे ९.८९ कोटी, पत्नीकडे १४.३० कोटी आहे. लखानींचे उत्पन्न व व्यवसाय अरुण लखानी आणि त्यांची पत्नी दोघेही बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या प्राप्तिकर विवरणपत्रानुसार अरुण लखानी यांचे वार्षिक उत्पन्न २१,६३,८८,१०० (२१.६३ कोटी) इतके दाखवले गेले आहे, तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ₹४,४१,५२,४६० (४.४१ कोटी) इतके आहे. स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील 1. अरुण लखानी : जंगम संपत्ती : ४५,२८,४९,१२८ (४५.२८ कोटी). यामध्ये ४.१३ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तूंचा समावेश आहे.
2. स्थावर संपत्ती (सध्याचे बाजारमूल्य) : २४,००,७८,४९० (२४ कोटी)
3. त्यांच्या पत्नीच्या नावावरील : जंगम संपत्ती: ३०,९९,८४,१६२ (३०.९९ कोटी). यामध्ये तब्बल ८ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने आणि डायमंड्स समाविष्ट आहेत.
4. स्थावर संपत्ती (सध्याचे बाजारमूल्य): ३६,०५,१३,७१६ (३६.०५ कोटी).
मुंबईतील मलबार हिल आणि नागपुरात त्यांच्या नावावर आलिशान फ्लॅट्स आहेत. कर्ज आणि दायित्व असे अरुण लखानी यांच्यावर विविध बँकांचे २,०२,७२,१८७ चे गृहकर्ज आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १३,६६,६३,४७२ चे दायित्व असून हे त्यांनी अरुण लखानी यांच्याकडूनच घेतलेले असुरक्षित कर्ज आहे. कोणत्याही शासकीय विभागाची थकबाकी त्यांच्यावर नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर