ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

तालुक्यात नैसर्गिक शेतीचा जागर

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकऱ्यांचे प्रशिक्षणातून प्रबोधन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मारेगाव तालुक्यातील सराटी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात सराटी व कान्हाळगाव येथील राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान क्लस्टरमधील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

सराटी येथील नैसर्गिक शेती करणारे शेतकरी सुभाष ढेंगळे यांच्या शेतात हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंडळ कृषी अधिकारी किशोर डोंगरकार यांनी जमिनीच्या आरोग्यावर रासायनिक शेतीचे होणारे परिणाम व सेंद्रिय कर्बाचे महत्त्व स्पष्ट केले.

कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, नैसर्गिक निविष्ठा, वनस्पतीजन्य कीटकनाशके यांची माहिती दिली. तसेच बिजामृत, जिवामृत, आच्छादन व वापसा या नैसर्गिक शेतीच्या मूलतत्त्वांवर शेतकऱ्यांचे प्रबोधन केले.

ज्येष्ठ शिक्षक शेषराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद मानकर सर व अढाऊ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणस्थळी मनोज ढेंगळे यांच्या गांडूळखत, दशपर्णी अर्क, जिवामृत, अमृतपाणी, जैविक पोटॅश आदी नैसर्गिक उत्पादने निर्मिती प्रकल्पाला भेट देण्यात आली. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसन्न पारस्कर यांनी नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व संचालन प्रसन्न पारस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपकृषी अधिकारी विनायक जुमनाके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक कृषी अधिकारी निखिल पवार, सनथ घोसळकर, उदय नायक, समूह सहाय्यक श्यामल राऊत तसेच कृषी सखी हर्षा ढेंगळे, दिपाली लालसरे, आचल कुचराम, मनीषा टोंगे, सपना मिलमिले व सोनाली एलके यांनी परिश्रम घेतले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास परिसरातील शेतकरी तसेच गावातील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर