ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा:100 हून अधिक तरुण-तरुणी ताब्यात; लाखो रुपयांचे मद्य, तंबाखूजन्य पदार्थ, गांजा जप्त

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रेव्ह पार्टीचा (Rav Party) मुद्दा प्रचंड गाजत असतानाच, आता पुणे पोलिसांनी मध्यरात्री एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. पुणे जिल्हा अंतर्गत येणाऱ्या तुळापूर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात सुमारे १०० हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, यामध्ये अनेक अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईबाबत पुण्याच्या अप्पर पोलिस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात एका आलिशान बंगल्यात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. आयोजकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुपारी १ ते रात्री ११.३० वाजेपर्यंतची तात्पुरती परवानगी घेतली होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता मध्यरात्री उशिरापर्यंत ही पार्टी जोरात सुरू होती. नशेचे पदार्थ आणि लाखो रुपयांचे मद्य जप्त गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री जेव्हा या बंगल्यात प्रवेश केला, तेव्हा तिथे उपस्थित असलेले बहुतांश तरुण-तरुणी अंमली पदार्थांच्या आणि दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद होते. पोलिसांनी तातडीने या सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून पोलिसांनी लाखो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा जप्त केला आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू अप्पर पोलिस आयुक्त सातपुते यांनी पुढे सांगितले की, “पार्टीमध्ये सहभागी झालेले अनेक तरुण हे २१ वर्षांच्या आतील असण्याची दाट शक्यता आहे. या आयोजकांनी नियमांचे कशा प्रकारे उल्लंघन केले? याचा तपास केला जात असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या व्यक्तीने हा बंगला या पार्टीसाठी उपलब्ध करून दिला, त्याचा या गुन्ह्यात काही सहभाग आहे का? याचीही पडताळणी केली जात आहे.” तरुणाई कुठून आली? तपास सुरू या रेव्ह पार्टीत पकडण्यात आलेले तरुण-तरुणी नेमके पुण्याच्या कोणत्या भागातून अथवा इतर शहरांतून आले होते, याचा शोध लोणीकंद पोलिस आणि गुन्हे शाखा घेत आहे. सर्व संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असून, वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत. या कारवाईमुळे पुणे आणि परिसरातील बेकायदेशीर पार्टी संस्कृतीवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. हे ही वाचा… गोरेगाव पाठोपाठ वरळीच्या NSCI क्लबमध्ये ड्रग्जचा शिरकाव?:लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका तरुणाचा अचानक मृत्यू, एक गंभीर ​मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीने आणि सेवनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता वरळी येथील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनएससीआय (NSCI) क्लबमध्ये ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्टीत ड्रग्जच्या अतिसेवनामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर