ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शिवसेना ठाण्यापुरती नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचली:आमच्या जागा मविआच्या जागांच्या बेरजेपेक्षाही जास्त – एकनाथ शिंदे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला दैदिप्यमान यश मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपने विजयाची ‘सेंच्युरी’ मारली असून, शिवसेनेनेही 50 हून अधिक जागा जिंकत ‘हाफ सेंच्युरी’ पार केली आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेट याही निवडणुकीत अव्वल राहिला असून, महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या जागांची बेरीज केली, तरी ती एकट्या शिवसेनेच्या जागांपेक्षा कमी आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित न राहता आता चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, भाजपला 119, शिवसेनेला 59 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 36 जागांवर विजय मिळाल्याचे चित्र आहे. या निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयाचा आनंद व्यक्त करत विरोधकांवर निशाणा साधला. चांद्यापासून बांद्यापर्यंत भगवा फडकला निकालावर बोलताना शिंदे म्हणाले की, “काही लोक टीका करत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे. मात्र, आजच्या निकालाने दाखवून दिले आहे की, शिवसेना आता ठाण्यापुरती उरली नसून चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचली आहे. छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ घराघरात पोहोचला आहे. हा विजय राज्यातील लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि प्रत्येक मतदाराचा आहे.” भाजप नंबर एक, तर शिवसेना नंबर दोनचा पक्ष या यशाबद्दल त्यांनी मित्रपक्षांचेही कौतुक केले. “भारतीय जनता पार्टी राज्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन करतो. तर शिवसेना आज नंबर दोनचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात समर्थपणे उभा राहिला आहे. शिवसेना दिलेला शब्द पाळणारा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे,” असेही ते म्हणाले. विरोधकांना ‘घरचा’ रस्ता महाविकास आघाडीवर टीका करताना शिंदे यांनी घणाघाती टोला लगावला. ते म्हणाले, “ज्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आणि स्वतः घरी बसून राहिले, त्यांना मतदारांनी या निवडणुकीत कायमचे घरी बसवले आहे. महाविकास आघाडीच्या सर्व जागा एकत्र केल्या, तरी त्या शिवसेनेच्या तुलनेत कमी भरतात, यातच सर्व काही आले. आमचा हाच स्ट्राईक रेट आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्येही कायम राहील आणि तिथेही महायुतीचाच झेंडा फडकेल.” जनतेच्या न्यायालयाने न्याय दिला महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या जागांची बेरीज केली, तरी शिवसेनेच्या जागांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. खरी शिवसेना कुणाची हे पुन्हा एकदा मतदारांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे. शिवसेना ही शिवसैनिकांची, महाराष्ट्रातील जनतेची आहे. काही लोकांना ही आपली मक्तेदारी वाटत होती. काही लोक स्वत:ला शिवसेनेचे मालक समजत होते. निवडणूक आयोगाला दोष देत होते. कोर्टावर आरोप करत होते. जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असे म्हणत होते. आता जनतेच्या न्यायालयाने न्याय आणि कौल दिलेला आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर