ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुळेंच्या हस्ते सत्कार:पोतदारांच्या कार्यकाळत मोर्शी व वरुड रुग्णालयाचा कायापालट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय, वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार केला. या वेळी खासदार अमर काळे, खासदार बळवंतराव वानखडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी, मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, डॉ. प्रवीण चौधरी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने येथे विशेष कार्यक्रम घेतला. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे व इतर मान्यवर एकत्र आले होते. याच कार्यक्रमात डॉ.प्रमोद पोतदार यांचा सत्कार केला. त्यांच्या कार्यकाळात मोर्शी व वरुड रुग्णालयाचा कायापालट झाला असून, त्यासाठी शासनाने पुरस्कार देऊन त्यांना गौरवान्वीतही केले. त्याच क्रमात आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही डॉ. पोतदार यांना दोन चषक, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.डॉ. पोतदार यांच्यामुळे मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरीय एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला. याशिवाय याच रुग्णालयाला राष्ट्रीय कायाकल्प योजनेद्वारे राज्यातून दहा लाखाचा द्वितीय पुरस्कारही प्राप्त झाला. तिकडे वरुड ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार, डॉ. आनंदीबाई गौरव पुरस्कार, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर