ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

भंडाऱ्यांसाठी 1 हजार 100 ताट, ग्लास उपलब्ध:” माय वसुधा विकास” ची चौथी शाखा; पर्यावरण संवर्धनाचा ध्यास‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरात प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर कमी होऊन पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी कार्य करणाऱ्या माय वसुधा विकास संस्थेतर्फे १ वर्षांपासून “प्लॅस्टिक डिस्पोजेबलमुक्त अकोला अभियान’ राबवण्यात येत आहे. या संस्थेने आता चौथी शाखा कार्यासाठी सुरू केली असून, या अंतर्गत संस्थेने ११०० ताटे, ग्लास, चमचे, वाट्या, चहाचे पेले, मठ्ठाचे पेले, नाष्टा प्लेट निःशुल्क उपलब्ध झाले आहेत. फक्त न्या, वापरा आणि स्वच्छ धुऊन परत करा, एवढंच अकोलेकरांना करायचं असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. डॉ. मनीषा पालीवाल आणि डॉ. योगेश पालीवाल यांच्या माय वसुधा विकास संस्थेतर्फे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने व प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर लोकांनी टाळावा, यासाठी निःशुल्क ताट, ग्लास, वाट्या,चमचे, नाष्टा प्लेट, चहाचे पेले, मठ्ठासाठी पेले, वेस्ट टब इत्यादी उपलब्ध करुन देण्यात येतात. यासाठी विविध ठिकाणी शाखा सुरू केल्या आहेत. चौथ्या शाखेचे कामकाज आता सुरू झाले आहे. याप्रसंगी विजय गोखले, प्रा. डॉ. महेश डाबरे, डॉ. मनीषा पालीवाल, डॉ. दिनकर देशमुख व अमोल पाचकवडे यांच्या उपस्थितीत स्टीलचे ताट, ग्लास, चमचे व इतर साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. संस्थेतर्फे आजपर्यंत १ लाख ६० हजार पत्रावळ्या, ३ लाख २० हजार द्रोण, १ लाख ८० हजार हजार ग्लास, सात हजार नऊशे चमचे, पाच हजार दोनशे नाष्टा प्लेट, आठ हजार तीनशे चहाचे/ दुधाचे कप इतका प्लॅस्टिक डिस्पोजेबलचे कचरा वाचवण्यात यश आल्याचे डॉ. मनीषा पालीवाल यांचे म्हणणे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर