ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

साकोलीच्या शैक्षणिक विकासासाठी १.२५ कोटींचा निधी:​जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट; गटनेता संदीप बावनकुळेंनी केली प्रत्यक्ष पाहणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यातील साकोली शहरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला आकार देण्यासाठी आणि शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आमदार नानाभाऊ पटोले यांनी १ कोटी २५ लाखांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीतून जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार असून, यामुळे साकोलीतील शिक्षण विकासाला नवी गती मिळणार आहे. साकोली नगर परिषदेचे गटनेता तथा नगरसेवक संदीप बावनकुळे हे गेल्या अनेक दिवसांपासून शाळांमधील वर्गखोल्यांची कमतरता आणि इमारतींच्या दुरवस्थेबाबत आमदार नानाभाऊ पटोले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी त्यांनी दिलेली माहिती आणि केलेल्या प्रयत्नांमुळेच हा मोठा निधी खेचून आणण्यात यश आले आहे. मंजूर झालेल्या १ कोटी २५ लाखांच्या निधीतून खालीलप्रमाणे कामे केली जाणार आहेत: ​संदीप बावनकुळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी संदीप बावनकुळे यांनी सर्व शाळांच्या जागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र व सुसज्ज स्वच्छतागृहे, आणि शाळा परिसराचे सौंदर्यीकरण यावर भर दिला. येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात शाळांच्या उर्वरित कामांसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या पाहणी दौऱ्यावेळी सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता रमेश भेंडारकर, मुख्याध्यापक सेवकराम हटवार, मोरेश्वर बोकडे, कोचे सर, शाळा समिती अध्यक्ष हेमंतभाऊ भारद्वाज, योगराज मुंगमोडे तसेच शिक्षक वृंद आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळांचा चेहरामोहरा बदलून गुणवत्ता वाढेल विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळावे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या निधीमुळे शाळांचा चेहरामोहरा बदलेल आणि गुणवत्तेत भर पडेल, असे संदीप बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर