ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

‘आनंद तीर्थ-समवशरण’ भूमीवर क्षेत्र विशुद्धी विधी:उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराजांच्या सान्निध्यात रंगणार सोहळा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी यांच्या सान्निध्यात, अर्हम विज्जा प्रणेते उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीण ऋषीजी यांचा २०२६ मध्ये होणारा ‘समर्पण – सर्व कल्याण’ शिखर चातुर्मास सोहळ्याच्या तयारीचा शुभारंभ आनंदधाम परिसरात करण्यात आला. चातुर्मासासाठी उभारण्यात येणार असलेल्या ‘आनंद तीर्थ-समवशरण’ या मुख्य प्रवचन स्थळाच्या भूमीवर जैन परंपरेनुसार ‘क्षेत्र विशुद्धी’ हा मंगल विधी उत्साहात व भाविक वातावरणात झाला. हा समारंभ गुरु सुमती शिष्य उपप्रवर्तक अभिषेक मुनीजी, गुरु हेम शिष्य उपप्रवर्तक आशिष मुनीजी, गुरुवर्या विभाश्रीजी, साध्वी डॉ. आभाश्रीजी यांच्या पावन उपस्थितीत पार पडला.चातुर्मास सोहळ्याचे प्रमुख आधारस्तंभ सौरभजी परागजी बोरा यांच्या मातोश्री प्रमिलाबाई हेमराजजी बोरा व भगिनी डॉ. निलिमाजी बोरा यांच्या हस्ते जैन शास्त्रोक्त पद्धतीनुसार कलशपूजन व मंगल विधी पार पडले. अर्हम विज्जा प्रणेते उपाध्याय प्रवर पूज्य प्रवीण ऋषीजी यांनी विशेष प्रशिक्षित केलेल्या ‘कल्याण मित्र टीम’च्या माध्यमातून हा ‘क्षेत्र विशुद्धी’ कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. जैन आगम व शास्त्राधारित मंगल विधींमार्फत विविध सामाजिक व कौटुंबिक उपक्रम राबवण्याचे काम ही टीम करते. चातुर्मास समितीचे अशोक बोरा म्हणाले, उपाध्याय प्रवर पूज्य श्री प्रवीण ऋषीजी म.सा. यांचा २०२६ मधील चातुर्मास हा ‘शिखर चातुर्मास’ ठरणार असून, चार महिन्यांच्या या कालावधीत विविध धार्मिक प्रवचने, साधना शिबिरे, आध्यात्मिक उपक्रम व धर्मप्रभावना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आनंदधाम येथील वाढती भाविकसंख्या लक्षात घेऊन शेजारील विस्तीर्ण पटांगणावर ५० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा भव्य समवशरण मंडप उभारण्यात येत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी २५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे अद्ययावत भोजनगृह उभारले जात आहे. संपूर्ण चातुर्मासात गुरुदेवांचे वास्तव्यास्थान आनंदधाम हेच राहणार असून, तेथे विविध साधना शिबिरे देखील पार पडतील. कालपासून या भव्य मंडप उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.याप्रसंगी अशोक बोरा, राजेश भंडारी, आदेश चंगेडिया, विलास कटारिया, अनिल पोखरणा, सुरेश कांकरिया, मनसुख गुंदेचा, राजकुमार बोरा, सचिन देसरडा, विजय गुगळे, अभय गांधी, अभिजीत गांधी, विनोद कटारिया, अनिल कटारिया, कांतिलालजी गांधी, दिलीप मेहेर, संदीप गांधी, अतुल शिंगवी आदी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर