ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

अंनिसची संघर्ष फेरी:”प्रत्येक जण प्रयत्न करू.. भोंदू मुक्त गाव साकारू’, बुवाबाजी व भोंदूगिरीविरोधात दिली घोषणांची साद‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील बडी साजन मंगल कार्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘विवेक जागर संस्था’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीचा दुसरा दिवस विविध उपक्रमांनी गाजला. शनिवारी सायंकाळी पाच वाजता बडी साजन मंगल कार्यालय ते कोठी रोड मार्गे बाजार समिती आणि तेथून जुने बसस्थानक मार्गे पुन्हा बडी साजन मंगल कार्यालयापर्यंत एक भव्य व ऐतिहासिक ‘विरोधी संघर्ष फेरी’ काढण्यात आली. अंधश्रद्धेच्या बेड्या तोडण्यासाठी आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी या फेरीत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण नगर शहर दणाणून सोडले. फेरीत पुढील प्रमुख घोषणा देण्यात आल्या: “जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पोलिस ठाणे तेथे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, नातं विज्ञानाशी जोडू, बेडी अंधश्रद्धेची तोडू, “बुवा जर आहेच चमत्कारी.. दवाखान्याची का चढतो पायरी?, “प्रत्येक जण प्रयत्न करू.. भोंदू मुक्त गाव साकारू, अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. या संघर्ष फेरीत महा.अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव ठकसेन गोराणे, राज्य निमंत्रित कॉ. बाबा आरगडे, राज्य कार्यवाह ॲड. रंजना गवांदे, प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, विनायक सावळे, रुकसाना मुल्ला आणि विजय परब प्रामुख्याने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, सुधाकर काशीद, कृष्णात स्वाती, आरती नाईक, उत्तरेश्वर बिराजदार, सुरेश बोरसे, विलास निंबोरकर, मच्छिंद्रनाथ मुंडे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत, कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद भारुळे, डॉ. प्रकाश गरुड, जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा, सुखदेव फुलारी, भारतभूषण भागवत आदी उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ पुरस्कार बडी साजन मंगल कार्यालय येथे या संघर्ष फेरीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष लामते यांच्या हस्ते आणि राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका पुरस्कारांचे’ भव्य वितरण करण्यात आले. या सोहळ्याला राज्याध्यक्ष माधव बावगे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक डॉ. नितीन शिंदे आणि कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कारांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत मोलाचे लेखन व कार्य करणाऱ्या शिलेदारांचा गौरव करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर