ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

ओबीसी समाज एकवटल्यास सत्ताधाऱ्यांना घरी बसावे लागेल:तुमचा DNA OBC चा असेल तर आरक्षण वाचवा, लक्ष्मण हाकेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण चांगलेच तापले असून, ओबीसींना मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा मराठा समाजालाही लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. एकीकडे मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने आंदोलने करत आहेत, तर दुसरीकडे यामुळे मूळ ओबीसींवर अन्याय होईल अशी ठाम भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून मांडली जात आहे. याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, लक्ष्मण हाके यांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठे आव्हान दिले असून, ‘ओबीसी समाज एकवटल्यास सत्ताधाऱ्यांना घरी बसावे लागेल’, असा इशारा दिला आहे. ओबीसींचे आरक्षण वाचवा लक्ष्मण हाके म्हणाले, तुमचा डीएनए ओबीसीचा असेल तर ओबीसींचे आरक्षण वाचवा, अन्यथा तुम्हाला घरी बसवावे लागेल. निवडणुकीत तुम्हाला बघून घेऊ. बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणल्यावर देशातला जेन झी, कॉकरोच जनता पार्टीच्या रुपात एकवटले आहेत. आम्ही ओबीसी तर 60 टक्के आहोत. ओबीसी एकवटला तर सत्ताधारी, कारखानदार, भांडवलदार यांना घरी बसावे लागेल. जे ओबीसींनाते मराठा समाजाला हे आम्हाला मान्य नाही.ज्या दिवशी ओबीसी राजकीय भूमिका घेईल त्यादिवशी तुम्हाला पळता भुई थोडी होईल. ज्या दिवशी ओबीसी म्हणून ओबीसी एकत्र येईल, त्यादिवशी प्रस्थापित भांडवलदार, वतनदारांना घरी बसवू, असाही इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. शासनाची वैचारिक दिवाळखोरी दरम्यान, माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले होते की, ज्या योजना ओबीसींसाठी, त्याच योजना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय झाला आहे. ज्या योजना ओबीसी समाजाला दिल्या आहेत, त्या अभ्यासपूर्ण आहेत. याच योजना मराठा समाजासाठी जाहीर करत आहेत, त्यामागचे लॉजिक आम्हाला कळले नाही. मराठा समाज त्या नियमांत बसतो का? ही तर शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर