ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

काँग्रेस-उबाठा, शिंदेंच्या उमेदवारांना मतदान केले तर काय फायदा:त्यांच्याकडे निधी देणारे कोण? भाजपच्या नीतेश राणेंचा सवाल

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहे. तुमच्या परिसराचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचीच सत्ता लागेल. या भागात निधीसाठी आपण निवडणूक लढवण्याची गरज पडते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना मतदान केले तर निधी मिळेल ज्यांच्याकडे सत्ताच नाही त्यांना मतदान केले तर त्यांच्याकडून कामे होणार आहेत का? उद्या अन्य पक्षाचे उमेदवार निवडून गेले तर त्याचा काय उपयोग कोण आहे त्यांच्याकडे असा सवाल भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी केला आहे. नीतेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री, पंतप्रधान, ग्रामविकास मंत्री, अर्थखाते आमच्याकडे म्हणजे निधी देण्याचा अधिकार असलेले सर्व लोकं आमच्या पक्षाचे आहेत. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आमच्या पक्षाचे असले पाहिजे. कारण तुमच्या भागाचा विकास करण्याची क्षमता आणि पाहिजे तेवढा निधी देण्याची क्षमता आमच्याकडे आहे. उबाठा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निवडून दिल्याने काय फायदा होणार आहे? त्यांच्या पक्षाकडे कोण आहे? ज्या ज्या ठिकाणी निधीचा विषय येतो तिथे भाजपचे नेते आहेत निधी देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे नीतेश राणे म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती भाजपकडे असेल तर विकासाला चालना मिळू शकेल. तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देण्याचे काम करू. या भागाच्या विकासाची जबाबदारी माझाी असेल. बाकीच्या पक्षांकडे काही अधिकारच नाही, सरकारमध्ये निधी वाटण्याचे आणि देण्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. राज्यातील कोणत्याही कामांना मुख्यमंत्र्यांची मान्यता जोपर्यंत मिळत नाही तो एकही रुपयांचा निधी मिळू शकत नाही. माझे जेवढे लक्ष माझ्या मतदारसंघात असणार आहे तेवढचे लक्ष राधानगरीमध्ये सुद्धा असणार आहे. त्यांच्याकडे निधी द्यायला कोण? नीतेश राणे म्हणाले की, उर्वरित पक्षांचे सर्व लोकं येतील मोठी मोठी भाषणे करतील पण त्यांच्याकडे तुमच्या भागाचा विकास करण्यासाठी काहीही नाही. उबाठा, काँग्रेसवाले अमेरिका की पाकिस्तान कुठून निधी आणणार. त्यांची लायकी आहे का निधी देण्याची? त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे निधी देण्याची हिंमत आहे का? त्यांना माझ्या स्टाईलने प्रशन विचारा. की तुमची सत्ता नाही तर तुम्हाला काय गोट्या खेळायला मतदान करावे का असा प्रश्न विरोधी पक्षातील उमेदवारांना विचारा.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर