ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

रुग्ण उपचारांमध्ये गय करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार:अभ्यागत समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी रुग्णालय प्रशासनास दिला इशारा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रूग्णालयात पत्नी आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावपळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोमवारी अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासगत समितीचे अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी बैठक घेतली. सामान्य नागरिकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात सुविधा मिळाल्याच पाहिजेत. रुग्णांना त्रास होता कामा नये. उपचारांमध्ये कसूर करणाऱ्या विरुद्ध व त्यांना पाठिशी घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार सावरकर यांनी दिला. रुग्णांच्या नावावर सरकारला व प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रकार करून जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्त्वापासून सावध राहण्याची आवाहनही आ. सावरकर यांनी केले. सध्या स्वतः व्हिडिओ काढायचा आणि आंदोलनात सहभागी असा प्रकार सातत्याने सुरू आहे. रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या सर्व ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. संवेदनशील तसेच मानवता या नात्याने राजकारण न करता वंचित पीडित आधार सुविधा देण्याची गरज आहे, असेही आ. सावरकर म्हणाले. वेळेवर मदत देऊन मानवता या नात्याने चांगल्या पद्धतीने वागणूक देण्यात यावी तसेच याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी आदेश त्यांनी दिले. चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहणार असून रुग्णांसोबत गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही असेही त्यांनी बैठकित बजावले. बैठकीमध्ये महापौर शारदा खेडकर, रणजीत खेडकर उपमहापौर अमोल गोगे, डॉ. किशोर मालोकार, गिरीश जोशी, शंकर वाकोडे, अँड देवाशीष काकड, धनंजय धबाले, बबलू जगताप, विवेक भरणे, अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने, डॉ. आढे, डॉ. सपकाळ, डॉ. नेताम, डॉ. रघुवंशी आदींची उपस्थिती होती. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनीही रूग्णालय परिसरात धाव घेत पाहणी केली. एका ठिकाणाचा वॉटर कुलर बंद असून, रूग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना पाणी मिळत नाही. येथील दोन कर्मचारी गायब आहे. संबंधित सुपरवायजरचा फोन बंद आहे. ११०० बेड मंजूर असून, एका खाटेवर दोन रूग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. डॉक्टर, परिचारीकांची पदे रिक्त आहेत. अशा पद्धतीने उपचार होत आहेत. आम्ही सत्तेतील आमदार आहोत.दोेष द्यायचा कोणाला असेही ते म्हणाले. मात्र राज्य विधिमंडळाच्या आगामी अधिवेशाचात मुद्दा मांडण्यात येईल. आरोग्य सुविधांबाबत सरकारने धोरण आखणे आव‌श्यक आहे, असेही आ. कडू म्हणाले. या वेळी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना रुग्णांच्या दृष्टिने महत्वाच्या असलेल्या अनेक सुख सुविधा वेळेवर पोहचवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा आणि रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी नेहमी तत्पर रहावे अशा देखील आमदार बच्चु कडू यांनी सूचना केल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर