ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

वाढत्या उन्हावर एकच उपाय, ‘माणसी एक झाड लावा’:वृक्षमित्र पोपटराव रसाळांच्या वृक्ष बँके”तून निघोज परिसरात 200 हून अधिक रोपांची लागवड‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वृक्षमित्र पोपटराव रसाळ यांनी स्मशानभूमी परिसरात गेल्या सात वर्षांपासून वृक्षारोपण करून हा भाग निसर्गरम्य केला आहे. त्यांचे हे कार्य निघोजकरांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन ‘संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन’चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी केले. येथील स्मशानभूमी परिसर, दशक्रिया विधी घाट आणि बाजारतळ या ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वड, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ, करंज आणि आंबा या प्रजातींच्या जवळपास २०० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षमित्र पोपटराव रसाळ, स्थानिक ग्रामस्थ आणि मुलिकादेवी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. रसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या ७ वर्षांत या भागात ५०० हून अधिक झाडे जगवली असून मोरवाडी व रसाळवाडी येथे ‘वृक्ष बँके’ची स्थापना केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने आणि शांताराम लंके व बाबासाहेब कवाद यांच्या हस्ते त्यांनी मोरवाडी परिसरात हजारो वृक्षांचे संवर्धन केले आहे. कार्यक्रमास माजी अध्यक्ष प्रभाकर कवाद, संतोषशेठ रसाळ, दत्तात्रय रसाळ, राजेंद्र लाळगे, पत्रकार संघाचे अमोल खिलारी, भास्करराव कवाद, माजी उपसभापती खंडू भुकन आदींसह मान्यवर उपस्थित होते. सचिन वराळ यांनी “कोरोना काळानंतर ऑक्सिजनचे महत्त्व समजले असून रसाळ यांच्या कृतीतून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे सांगितले. प्रा. अमोल खिलारी यांनी वाढत्या तापमानावर बोट ठेवत प्रत्येक नागरिकाने एक झाड लावण्याचे आवाहन केले आणि एनएसएस विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. ५ वर्षांत १० हजार वृक्षलागवडीचा संकल्प “अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने मी औरंगाबाद येथे २५ हजार वृक्ष लावून ‘वृक्ष बँक’ स्थापन केली होती. आता आपल्या गावाचे ऋण फेडण्यासाठी निघोज परिसरात लोकसहभागातून हजारो वृक्षांचे संवर्धन करत आहे. येत्या ५ वर्षांत १० हजार वृक्षारोपणाचा आमचा संकल्प असून प्रत्येक निघोजकर यासाठी मोलाची मदत करत आहे, असे वृक्षमित्र रसाळ म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर