ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पिकांचे अवशेष बारीक करून शेतातच कुजविण्याची मोहीम

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कृषि विभागाचा पुढाकार

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे क्षेत्र असून कापूस काढणीनंतर पऱ्हाट्या उपटून जाळून टाकण्याची प्रथा सर्वसाधारणपणे दिसून येते. मात्र या पऱ्हाट्या बारीक करून जमिनीत मिसळल्यास उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होत असल्याने कृषि विभागाच्या वतीने पिकांचे अवशेष शेतातच कुजविण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवायचे असल्यास जमिनीची सुपीकता टिकवणे आवश्यक आहे. याच उद्देशाने तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कॉटन श्रेडरच्या माध्यमातून कापूस पिकांचे अवशेष बारीक करून जमिनीत मिसळण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कॉटन श्रेडर हे यंत्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

साधारणपणे एका हेक्टर कापूस पिकातून २० ते ३० क्विंटलपर्यंत पऱ्हाट्या उपलब्ध होतात. त्या बारीक करून जमिनीत मिसळल्यास मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता होते आणि जमीन अधिक सुपीक बनते. तसेच माती भुसभुशीत होऊन तिची जलधारण क्षमता वाढते. परिणामी उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते, असे मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी सांगितले.

दरम्यान, महादापेठ येथे नुकतेच कॉटन श्रेडरच्या माध्यमातून पऱ्हाट्या काढण्याचे प्रात्यक्षिक सहायक कृषि अधिकारी अक्षय सोनूले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकावेळी महादापेठ (कुंभा) येथील अमोल बोथले, दशरथ चौधरी, हितेंद्र बोथले, प्रकाश मोहितकर, विवेक जेणेकर, अनंत बोथले यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख दिपक कच्छवे व राहुल चव्हाण यांनी कॉटन श्रेडर उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषि विभाग तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर