ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

लाच प्रकरणात ग्रामसेवकाला जामीन मंजूर:सवना येथील घरकुलासाठी घेतली होती अडीच हजारांची लाच

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सेनगाव तालुक्यातील सवना येथे घरकुलाच्या प्रस्तावासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एन. माडे गाडेकर यांनी शनिवारी ता. १६ जामीन मंजूर केला आहे. सेनगाव तालुक्यातील सवना येथील एका लाभार्थ्याला मंजूर झालेल्या घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरी करून प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी याने लाभार्थ्याकडे ५ हजाराची मागणी केली होती. मात्र त्यानंतर अडीच हजारात तडजोड झाली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सुलभा राऊत यांच्या पथकाने त्यास गोरेगाव येथील गोरेगाव चौफुली वर बुधवारी ता. १३ लाच घेतांना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यास न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, ग्रामसेवक खिल्लारी याच्या वतीने ॲड. मनिष साकळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. माने गाडेकर यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणात ग्रामसेवक खिल्लारी याच्या वतीने ॲड. मनिष साकळे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सिध्दार्थ थोरात, ॲड. अविनाश बांगर, ॲड. हर्ष बनसोडे, ॲड. चेतन अग्रवाल यांनी सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर