ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

एमएचटी-सीईटी निकालामध्ये पारनेर पब्लिक स्कूलचा दबदबा:इंद्रनील औटी 99.91 पर्सेंटाइल गुण मिळवून जिल्ह्यात पहिला‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र शासनातर्फे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एम एचटी-सीईटी परीक्षेच्या निकालात ‘पारनेर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स’ने आपला यशाचा दबदबा कायम राखला आहे. विद्यालयातील २७ विद्यार्थ्यांना ९५ पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळाले. इंद्रनील औटी याने ९९.९१ परसेंटाईल गुणांसह संस्थेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. विद्यालयाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत असताना लागलेला हा निकाल संस्थेच्या यशाचा चढता आलेख दर्शवतो. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना मन लावून अभ्यास केला आणि स्वप्ने मोठी पाहिली, तर नक्कीच उच्च कोटीचे यश मिळते, असा विश्वास प्राचार्य गीताराम म्हस्के यांनी व्यक्त केला. या यशाबद्दल डांगेज पॅटर्नचे संस्थापक ज्ञानेश डांगे, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे आणि संस्थेच्या अध्यक्षा सविता म्हस्के यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना शंभूनाथ भालेकर, रोहिदास वळसे, ज्ञानेश भांड, विक्रम गाडगे व नितीन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर निवड झालेले पारनेर पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी लेफ्टनंट प्रकाश गायकवाड व लेफ्टनंट प्रसाद गायकवाड तसेच सुभेदार भास्कर गायकवाड आणि मंदा गायकवाड यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सचिन मोढवे यांनी, तर आभार शंभूनाथ भालेकर यांनी मानले. ९५ पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण असणारे विद्यार्थी : इंद्रनील औटी ९९.९१‌, चैतन्य औटी -९९.८६,अनिकेत जाधव ९९.८३, आर्यन पवार ९९.७९,श्रेयश शिरोळे ९९. ७३,आकाश हारदे ९९.६२, साई चौधरी ९९.६०, स्वामिनी काळे ९९.६०,स्वरूपा गागरे ९९.५८, साहिल भगत ९९.४७,यश रेपाळे ९९.३९, हर्षद डमरे ९९.०३,श्रुतिका औटी ९८.६०,सौरभ बुरगोणी ९८.५८,तेजस ठुबे ९८.३२,तनिष्का थोरात ९८.१३,श्रेयश रसाळ ९७.७४,स्नेहा घेगडे ९७.६८,सार्थक औटी ९७.६१,श्रावण एरंडे ९७.३४, श्रुती सुंबे ९७.३०,सोमनाथ सोबले-९७,३०,तन्मय कांडेकर‌ ९७.३०,सार्थक कोल्हे ९७.२९, वैष्णवी दुधाडे ९७.१६,सुप्रिया ठाणगे ९७.११,विजय मापारी ९७.११, हर्षवर्धन दळवी ९६.५३,प्रतीक खामकर ९६.३४,प्रमेय मगर ९६.२७,सार्थक थोरात ९६.०१, ऐश्वर्या जाधव ९५.९२,साक्षी काळे ९५.३८,दर्शन इंगळे ९५.१९,श्रेयश बोरुडे ९५.१३,सुमित कोल्हे ९५.०९.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर