ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

माबूद बागवान यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड:चार स्विकृत सदस्यांचीही निवड, हिंगोली पालिकेची पाहिली सर्वसाधारण सभा संपन्न

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे माबूद बागवान यांची शुक्रवारी ता. १६ बिनविरोध निवड झाली आहे. या शिवाय शिवसेनेच्या दोन, भाजपाच्या एक तर राष्ट्रवादीच्या एका स्विकृत सदस्याचीही निवड झाली आहे. या निवडीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. हिंगोली येथील पालिकेच्या सभागृहात शिवसेनेच्या नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे १६, राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे दोन, भाजपाचे पाच नगरसेवकांची उपस्थिती होती. या शिवाय पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांचीही यावेळी उपस्थिती होती. हिंगोली पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे माबूद बागवान यांचा उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची निवड जाहिर करण्यात आली आहे. या शिवाय शिवसेनेचे स्विकृत सदस्य पदी गुड्डू बांगर, नितीन बांगर, राष्ट्रवादीचे शेख शकील, भाजपाचे कैलास शहाणे यांची निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. दरम्यान, उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल तसेच स्विकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माबूद बागवान, गुड्डू बांगर, नितीन बांगर यांचा सत्कार केला. तर राष्ट्रवादीने शेख शकील तर भाजपाच्या पदाधिकारी व कार्यर्त्यांनी कैलास शहाणे यांचा सत्कार केला. दरम्यान, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, ॲड. अविनाश बांगर, गणेश बांगर, संदीप मुदीराज, संतोष गोरे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. चौकटीचा मजकूर माबूद बागवान यांच्या प्रभागात शिवसेनेला जास्त मताधिक्य पालिका निवडणुकीत माबूद बागवान यांच्या प्रभागातून शिवसेनेला नगराध्यक्षपदासाठी सर्वात जास्त २७०० मतांंची आघाडी मिळाली होती. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी माबूद बागवान यांचीच निवड होईल अशी अपेक्षा होती. त्यानंतरही आमदार संतोष बांगर कोणाच्या पारड्यात वजन टाकणार यावर सर्वबाबी अवलंबून होत्या. त्यानंतर आमदार बांगर यांनी माबूद बागवान यांच्या निवडीला हिरवा कंदील दाखविला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर