ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

पार्थ पवारांना क्लीन चीटच्या बातम्या राजकीय हेतूने पेरलेल्या:अंजली दमानियांचा दावा; खारगे समितीला तो अधिकारच नाही; तटकरे, पटेल, भुजबळांवर टीका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांना कथित क्लीन चीट मिळाल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. या बातम्या पूर्णपणे खोट्या असून त्या राजकीय हेतूने माध्यमांमध्ये पेरल्या गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत काही नेते सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याच्या प्रयत्नात असल्याचेही त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर त्यांनी सडकून टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणताही अधिकृत अहवाल अद्याप जाहीर झालेला नसताना क्लीन चीटची बातमी कशी काय प्रसिद्ध होते? खारगे समितीला असा निकाल देण्याचा अधिकारच नाही, असे त्या म्हणाल्या. ही माहिती संबंधित गटाकडूनच जाणीवपूर्वक बाहेर सोडली गेली असावी, असा त्यांचा आरोप आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी त्यांची प्रतिमा सुधारण्याची मोहीम राबवली जात असल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवरही दमानिया यांनी भाष्य केले. पक्षात सध्या मोठी घाई सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, उरलेले नेते म्हणजे सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे भाजपची बी टीम म्हणून काम करत असून पक्षाची सर्व सूत्रे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा संपूर्ण प्रकार नियोजनबद्ध असल्याचा आरोप त्यांनी केला. दमानिया यांनी प्रशासकीय कारभारावरही प्रश्न उपस्थित केले. ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल येथे नियमांचे उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज त्यांना यासंबंधी व्हिडिओ मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आणि नाईक यांच्या नवी मुंबईत असे प्रकार जास्त प्रमाणात होत असल्याचे त्यांनी नमूद केले. व्ही आर एस कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा होता, मात्र तसे झाले नाही, असेही त्या म्हणाल्या. याच वेळी त्यांनी विमान अपघात प्रकरणातील ब्लॅक बॉक्सच्या माहितीकडे लक्ष वेधले. ब्लॅक बॉक्समधील माहिती का पुनर्प्राप्त होत नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनातील ढिसाळपणा आणि राजकीय हस्तक्षेपामुळेच अहवाल बाहेर येण्यास विलंब होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. दमानिया यांनी कुटुंबीय भूमिकेवरही भाष्य केले. सुनेत्रा पवार जर झिरवळ यांच्यावर नाराज असतील, तर त्या पार्थवर का नाहीत? तो मुलगा आहे म्हणून त्याला वाचवले जाते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मंत्रालयात प्रत्येक कामासाठी दर ठरलेले असल्याचा आरोप करत त्यांनी विविध ट्रस्टच्या माध्यमातून पैसे घेतले जात असल्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले मी स्वतः मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवून या प्रकरणाचा अधिकृत अहवाल मागितला आहे, असे दमानिया यांनी सांगितले. जोपर्यंत अधिकृत कागदपत्र समोर येत नाही, तोपर्यंत अशा बातम्या देणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. राजकीय दबावामुळे अहवाल दडपला जातो, जसे एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात झाले होते, असा आरोपही त्यांनी केला. या सर्व आरोपांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून पुढील काही दिवसांत या वादाला आणखी उधाण येण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर