ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

गावाची एकी:पोलिस ठाण्याची पायरी न चढता लिंगदेव गावाने रोखला बालविवाह, कुटुंबाचे मतपरिवर्तन, मुलीच्या शिक्षणाची गावाने घेतली जबाबदारी‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कायदा हातात न घेता, कायद्याने हात बळकट करा याचाच आदर्श वस्तूपाठ अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. पोलिस ठाण्याची पायरी न चढता, केवळ जागरूकता, सामाजिक एकजूट आणि सकारात्मक संवादाच्या जोरावर लिंगदेवमध्ये होणारा संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले आहे. लिंगदेव येथील एका कुटुंबात अल्पवयीन मुलीचा विवाह ठरल्याची माहिती पोलिस पाटील मंगल पवार यांना मिळाली. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर खटला उभा करण्याऐवजी गावातच हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचे ठरवले. त्यांनी सरपंच अमित घोमल, तंटामुक्ती अध्यक्ष लहानू फापाळे, गणेश पवार, आरोग्य सेविका माधुरी उगले, आशा सेविका सुपरवायझर मनीषा जाधव, सुचिता आढाव आणि सामाजिक कार्यकर्ते परशुराम महाराज कानवडे यांच्याशी संपर्क साधून वधू व वर पक्षाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गावकऱ्यांचा सकारात्मक आणि मुलीच्या भल्याचा हेतू लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी हा विवाह तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच आणि तिच्या संमतीने लग्न करू, अशी लेखी कबुली कुटुंबाने दिली. विशेष म्हणजे, या मुलीस पुढील शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही संपूर्ण गावाने दिली आहे. पोलिसांची कोणतीही बळजबरी न वापरता सामाजिक एकजुटीतून हा संवेदनशील प्रश्न सोडवल्याबद्दल लिंगदेव गावाचे सर्वत्र कौतुक होत असून, बालविवाहासारखी कुप्रथा नष्ट करण्यासाठी प्रत्येक गावाने हाच आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, तो गुन्हा घडूच न देणे ही खरी सामाजिक जबाबदारी आहे. लिंगदेवच्या ग्रामस्थांनी आणि महिला सहकाऱ्यांनी दाखवलेली सजगता कौतुकास्पद आहे. संवाद आणि योग्य समुपदेशनातून मोठे सामाजिक बदल घडवता येतात, हे या घटनेने सिद्ध केले, असे पोलिस पाटील मंगल पवार यांनी सांगितले. मुलीच्या आरोग्याची काळजी पटवून दिली सुरुवातीला लग्न जमवलेल्या कुटुंबांमध्ये काहीशी गोंधळलेली अवस्था निर्माण झाली होती. मात्र, ग्रामस्थांनी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने त्यांचे समुपदेशन केले. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ मधील कडक तरतुदी, होणारी जेल आणि दंडाची माहिती दिली. त्याचसोबत अल्पवयात लग्न झाल्यास मुलीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि तिच्या शिक्षणाची होणारी हानी उदाहरणासह पटवून दिली. “मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब प्रगतीपथावर जाते, हा विचार कुटुंबाच्या समजावून सांगण्यात गावकऱ्यांना यश आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर