ब्रेकिंग न्यूज
⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह…
SP News Maregaon

सरकारकडून स्टेनोग्राफर पद मृत घोषित:राज्यातील हजारो तरुणांची निराशा, विद्यार्थी आक्रमक; नोकरीच्या संधी हिरावून घेऊ नका – सुळे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करत त्यावरील भरती प्रक्रियेला फुलस्टॉप दिला आहे. राज्यातील बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असताना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पदाची भरती करते. पण आता सरकारने हे पद मृत घोषित करून त्यावरील भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे हजारो तरुणांचे स्टेनोग्राफर होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात कमालीचा रोष पसरला आहे. एकीकडे सरकार पदभरती करत नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीने आहे ती पदे रद्द करण्याचा निर्णय घेते, असा आरोप विद्यार्थ्यांनी या प्रकरणी केला आहे. विद्यार्थ्यांचा सरकारच्या निर्णयावर संताप सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करू नये. कारण विद्यार्थी मागील 5 वर्षांपासून या पदाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. आता सरकारने अचानक हे पद रद्द केल्याने त्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. त्यामुळे सरकारने हे पद मृत घोषित न करता त्यावर भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतलेल्या लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात बुडण्याची भीती आहे. सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी स्टेनोग्राफर पदाची तयारी करतात. आता शासनाने ही भरतीच बंद केली, तर त्यांनी जायचे कुठे? विद्यार्थी गत अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत हरोते. आता लगेच दुसरी फिल्ड निवडताही येत नाही, अशी खंतही काही विद्यार्थ्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. रोजगाराच्या संधी हिरावून घेऊ नका – सुप्रिया सुळे दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी सरकारचे कान टोचलेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून ‘स्टेनोग्राफी’ चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. ही भरती शासनाने रद्द केल्याने आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या पदासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची कैफियत शासनाने एकदा ऐकून घ्यावी. हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्ये जोडून ते सुरू ठेवण्याचा पर्यायही तपासून पहावा. तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर