ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

रुपाली चाकणकरांवर होणार कारवाई?:राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिले संकेत; सुनील तटकरेही चांगलेच संतापले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे नाव आल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. या प्रकरणी चाकणकरांवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणात नाव आलेल्या सर्वांवर कारवाई करण्याचे विधान केले आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांवर कारवाई होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यातील अनेक महिलांना गुंगीचे औषध देऊन त्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याशिवाय त्यांचे अनेक फोटोही समोर आलेत. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील – ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यास अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस योग्य ती कारवाई करेल प्रपुल्ल पटेल या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीत नाव आलेल्या सर्वांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. ही कारवाई तातडीने व सक्तीने केली गेली पाहिजे. काही राजकीय लोकांचे नाव आले आहे. त्यांच्यावरही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून योग्य ती कारवाई करणार. हे तुम्हाला पुढील एक-दोन दिवसांत दिसून येईल. सुनील तटकरेंनी भाष्य करणे टाळणे दुसरीकडे, पत्रकारांनी रुपाली चाकणकरांविषयी प्रश्न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. सुनील तटकरे यांनी आज महाड येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमांनंतर पत्रकारांनी तटकरेंना रुपाली चाकणकरांविषयी प्रश्न केला. त्यावर ते चांगलेच संतापले. ही जागा त्या प्रकरणावर बोलण्याची नाही. मी त्यावर योग्यवेळी भाष्य करेन. मला घटनेने अधिकार दिला आहे. मला ज्यावेळी बोलायचे आहे, त्यावेळी बोलेन, असे म्हणत सुनील तटकरे पत्रकारांना टाळून तातडीने निघून गेले. सुषमा अंधारेंचे रुपाली चाकणकरांवर धक्कादायक आरोप उल्लेखनीय बाब म्हणजे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केलेत. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. अशोक खरात – चाकणकरांत घरगुती संबंध सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या, रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर