ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पुढील वर्षापर्यंत विद्यार्थी पाठशाळा सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास:आमदार प्रकाश भारसाकळे यांचे प्रतिपादन; विद्यार्थ्यांची ऊर्जा प्रेरणादायी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्री संत वासुदेव महाराज सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकातून बघायला मिळालेली ज्ञान संपादणूक अतिशय आनंद देणारी व अभिनंदनीय आहे. हे विद्यार्थी म्हणजे देशाचे उज्वल भविष्य आहेत. या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी गतवर्षी भूमिपूजन झालेल्या विद्यार्थी पाठशाळेच्या वास्तूची उभारणी पुढील वर्षापर्यंत निश्चित पूर्णत्वास जाईल, असा विश्वास आमदार प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केला. शासकीय प्रक्रियेमुळे या कार्याला विलंब होत असला तरी आता मात्र या कामाची अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. याकरिता मी सर्वतोपरी कटिबध्द आहे, असेही ते यावेळी म्हणाले. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट द्वारा आयोजित श्री क्षेत्र श्रद्धासागर येथील बालसंस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. उपस्थित मान्यवरांनी सुद्धा माणूस घडवण्यासाठी एआय सारख्या तंत्रज्ञानाची नव्हे तर सुसंस्कारांची गरज आहे. १४ ते ३५ वयोगटाच्या खूप जास्त आत्महत्या होत आहेत. ही चिंतेची बाब आहे. संस्कार रुजविण्याचे आणि संस्कृती रक्षणाचे काम या बालसंस्कार शिबिरातूनच घडते. सद्गुरु श्री संत वासुदेव महाराजांच्या विचाराची धुरा श्री संस्था सांभळत आहे, याबाबत उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. समारोपासाठी सुभाष महाराज काळे, साहेबराव पखान, शिक्षण तज्ज्ञ प्रभातचे डॉ. गजाननराव नारे, सचिन बुरघाटे, डॉ. दिलीप काळे, राजेश नागमते, ज्ञानेशप्रसाद महाराज पाटील, अतुल महाराज बोर्डे, विवेक कांबे, अजाबराव वहिले, सागर महाराज परिहार, विष्णु महाराज गावंडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे बाबाराव बिहाडे, महादेवराव ठाकरे, पुरुषोत्तम लाजूरकर, रवींद्र वानखडे, मोहनराव जायले, अविनाश गावंडे, डॉ. अशोकराव बिहाडे, जयदीप सोनखासकर, अशोकराव पाचडे, नंदकिशोर हिंगणकर, अॅड शिरीष ढवळे, पुरुषोत्तम मोहोकार, अनिल कोरपे, गजाननराव दुधाट, केशवप्रसाद राठी, त्याचप्रमाणे प्रा. साहेबराव मंगळे, मधुकरराव पुंडकर, जयकृष्ण वाकोडे, प्रकाशराव साबळे, महेंद्र शेलकर, सुरेंद्र चिकटे, अनिल गोंडचर, राजेश कुलट, अमोल डोंगरे यांसह अध्यापक मंडळी तथा बहुसंख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उमेश महाराज मोहोकार यांनी केले. प्रास्ताविक आणि प्रात्यक्षिक अंबादास महाराज मानकर, राम महाराज गाढे, ज्ञानेश्वर माऊली डांगरे यांनी सादर केले. आभार रविंद्र वानखडे यांनी मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर