ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगावात उद्या आरोग्यसेवेचा महायज्ञ! मोफत शिबिरात सर्वरोग तपासणीसह शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन ✦ ⚡ अभिनंदन! भारतानं मोडला अमेरिकेचा जागतिक विक्रम, ‘शंखनाद’ करण्यात नवा रेकॉर्ड, Video ✦ ⚡ PAK vs ENG : 242 चं टार्गेट, पाकिस्तान 154-9… हृदयाचे ठोके थांबवणाऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानचा थ्रिलर चेस; इ… ✦ ⚡ पीएम किसानचा हप्ता ३० ऑक्टोबरला, पण ‘नमो’चे दोन हप्ते कधी येणार? सणासुदीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल ✦ ⚡ कोल्हापूर हादरलं! पत्नीनं झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घातला, कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट ✦ ⚡ Satara News: बंद दाराआड बैठक अन् खेळ पलटला! पृथ्वीराज चव्हाण-शंभुराज देसाई यांच्या भेटीनं खळबळ; साताऱ्यात र… ✦ ⚡ Nashik News: हळद, धने अन् मिरची पावडरचं धक्कादायक वास्तव, दिवाळीआधी मुंढेंच्या टीमची मोठी कारवाई, नाशिकमध्य… ✦ ⚡ Pune Accident : कॉलेजला निघालेल्या ७-८ विद्यार्थिनी; बसची वाट बघत असतानाच अंगावर धावून आला काळ, भरधाव कारनं… ✦ ⚡ बुरांडा–खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका! ✦ ⚡ मार्डीच्या ‘न्यू युवा समता दुर्गोत्सव मंडळा’चा सामाजिक संदेश देणारा उपक्रम; विसर्जन मिरवणुकीतून पोलिसांच्या कार्याला सलाम!
SP News Maregaon

पीएम किसानचा हप्ता ३० ऑक्टोबरला, पण ‘नमो’चे दोन हप्ते कधी येणार? सणासुदीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हातातोंडाशी आलेला घास निसटला आणि सणासुदीच्या तोंडावर खिशात पैसा उरला नाही. सध्या धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाची अवस्था अशीच काहीशी झाली आहे. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने शेतीचे अतोनात नुकसान केले, तर दुसरीकडे शासनाच्या आर्थिक मदतीचे हप्ते वेळेत न मिळाल्याने बळीराजासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. केंद्र सरकारचा ‘पीएम किसान’चा हप्ता ३० ऑक्टोबरला खात्यात जमा होणार असला, तरी राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चे सलग दोन हप्ते रखडल्याने जिल्ह्यातील तब्बल २ लाख ३३ हजार शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे.

शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आणि संकटाच्या काळात आधार मिळावा म्हणून केंद्र सरकारने २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. याद्वारे वर्षाला ६,००० रुपये (दर चार महिन्यांनी २,००० रुपये) दिले जातात. याच धर्तीवर महायुती सरकारने २०२३ मध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना आणून त्यात आणखी ६,००० रुपयांची भर घातली.

मात्र, सध्याची वस्तुस्थिती अत्यंत बिकट आहे. ‘नमो’ योजनेचा ९ वा आणि १० वा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही. त्यातच पीएम किसानचा आगामी हप्ताही रखडला आहे. लेकराबाळांचे लाड पुरवण्यासाठी, सण साजरा करण्यासाठी आणि खता-बियाण्यांचे देणे भागवण्यासाठी हा पैसा कधी मिळणार? याच विवंचनेत असलेला शेतकरी सध्या रोज कृषी विभागाच्या दारी चकरा मारताना दिसत आहे.

धाराशिव जिल्ह्यात या दोन्ही योजनांचे एकूण २ लाख ३३ हजार लाभार्थी शेतकरी आहेत. नियमांनुसार पाहिल्यास, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ‘नमो’चे दोन हप्ते साधारण ४००० रुपये आणि ‘पीएम किसान’चा हप्ता (२,००० रु.) मिळून एकूण ६,००० रुपयांची तातडीची मदत मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील या सर्व पात्र शेतकऱ्यांचा आकडा पाहता, सुमारे १३९ कोटी ८० लाख रुपयांचा मोठा निधी सध्या शासनस्तरावर अडकून पडला आहे.

हा पैसा थेट बँक खात्यात (DBT) जमा होतो, पण प्रशासकीय दिरंगाईमुळे बळीराजाची प्रतीक्षा अजून संपलेली नाही. आता पीएम किसानचा हप्ता 30 ऑक्टोबरला येणार आहे मात्र शेतकऱ्यांचे नमो शेतकरीचे रखडलेले पैसे कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर