ब्रेकिंग न्यूज
⚡ अवघ्या दहा वर्षांची लेक, घरात कुणी नसताना बापाचं भयंकर कृत्य, अंगावर थंड पाणी टाकलं अन्… छ. संभाजीनगरची घ… ✦ ⚡ अवघ्या दहा वर्षांची लेक, घरात कुणी नसताना बापाचं भयंकर कृत्य, अंगावर थंड पाणी टाकलं अन्… छ. संभाजीनगरची घ… ✦ ⚡ नाव जाहीर झालं पण डोळ्यावर विश्वास बसेना! ना वर्ल्ड कप जिंकवणारा यमाल, ना लिओनेल मेस्सी… कोण ठरला Ballon … ✦ ⚡ मारेगावात उद्या आरोग्यसेवेचा महायज्ञ! मोफत शिबिरात सर्वरोग तपासणीसह शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन ✦ ⚡ शिक्षणानंतर घेतला धाडसी निर्णय, सोलापूरच्या तरुणाच यशस्वी कुक्कुटपालन, महिन्याला 20 लाख उलाढाल ✦ ⚡ अभिनंदन! भारतानं मोडला अमेरिकेचा जागतिक विक्रम, ‘शंखनाद’ करण्यात नवा रेकॉर्ड, Video ✦ ⚡ PAK vs ENG : 242 चं टार्गेट, पाकिस्तान 154-9… हृदयाचे ठोके थांबवणाऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानचा थ्रिलर चेस; इ… ✦ ⚡ पीएम किसानचा हप्ता ३० ऑक्टोबरला, पण ‘नमो’चे दोन हप्ते कधी येणार? सणासुदीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल ✦ ⚡ कोल्हापूर हादरलं! पत्नीनं झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घातला, कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट ✦ ⚡ Satara News: बंद दाराआड बैठक अन् खेळ पलटला! पृथ्वीराज चव्हाण-शंभुराज देसाई यांच्या भेटीनं खळबळ; साताऱ्यात र…
SP News Maregaon

अभिनंदन! भारतानं मोडला अमेरिकेचा जागतिक विक्रम, ‘शंखनाद’ करण्यात नवा रेकॉर्ड, Video

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक: “अभिनंदन! तुम्ही एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे!” गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी ही अधिकृत घोषणा करताच रविवारी गोदावरीचा पवित्र तीर ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. अमेरिकेचा एकाच वेळी ३०३ शंखवादकांचा असलेला जुना विक्रम मागे टाकून नाशिकमध्ये तब्बल ५१७ व्यक्तींनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपल्या नावाची ऐतिहासिक नोंद केली आहे.

कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर नाशिकच्या गोदाकाठावरील ऐतिहासिक यशवंत महाराज पटांगणात अनंत विजय शंखनाद पथक आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ५१७ शंखवादकांनी एकाच वेळी फुंकलेल्या शंखध्वनीने संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण केले.

दिवाळीचा फराळ घरातून थेट सातासमुद्रपार जाणार! टपाल विभाग सज्ज, नेमकी योजना काय? Video

कठोर निकष आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत विक्रम सिद्ध

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी विश्वविक्रमाच्या पडताळणी प्रक्रियेची माहिती दिली. ते म्हणाले, "शंख वाजवणे ही केवळ धार्मिक कृती नसून त्यासाठी श्वसनावर नियंत्रण, नियमित सराव, प्राणायाम आणि उत्तम शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते. मोठ्या संख्येने सहभागींचा ताळमेळ साधून सामूहिक शंखनाद करणे अत्यंत आव्हानात्मक होते."

अमेरिकेचा ३०३ जणांचा पूर्वीचा विक्रम मोडण्यासाठी या कार्यक्रमात ५०० हून अधिक जणांनी नावनोंदणी केली होती. दोन विशेष निरीक्षकांनी सहभागींच्या नोंदी, प्रत्यक्ष सहभाग आणि निर्धारित वेळेची अचूक पडताळणी केली. सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर ५१७ जणांचा हा नवीन जागतिक विक्रम अधिकृतपणे घोषित करण्यात आला.

भारतीय संस्कृती आणि सामूहिक शक्तीचे दर्शन

विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्व ५१७ शंखवादकांचे कौतुक करत मनःपूर्वक अभिनंदन केले. हा उपक्रम देशाच्या लौकिकात भर घालणारा ठरला असून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि नाशिककरांच्या अफाट शिस्तीचे व एकजुटीचे दर्शन या विश्वविक्रमाच्या माध्यमातून जगाला झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर