ब्रेकिंग न्यूज
⚡ अवघ्या दहा वर्षांची लेक, घरात कुणी नसताना बापाचं भयंकर कृत्य, अंगावर थंड पाणी टाकलं अन्… छ. संभाजीनगरची घ… ✦ ⚡ अवघ्या दहा वर्षांची लेक, घरात कुणी नसताना बापाचं भयंकर कृत्य, अंगावर थंड पाणी टाकलं अन्… छ. संभाजीनगरची घ… ✦ ⚡ नाव जाहीर झालं पण डोळ्यावर विश्वास बसेना! ना वर्ल्ड कप जिंकवणारा यमाल, ना लिओनेल मेस्सी… कोण ठरला Ballon … ✦ ⚡ मारेगावात उद्या आरोग्यसेवेचा महायज्ञ! मोफत शिबिरात सर्वरोग तपासणीसह शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन ✦ ⚡ शिक्षणानंतर घेतला धाडसी निर्णय, सोलापूरच्या तरुणाच यशस्वी कुक्कुटपालन, महिन्याला 20 लाख उलाढाल ✦ ⚡ अभिनंदन! भारतानं मोडला अमेरिकेचा जागतिक विक्रम, ‘शंखनाद’ करण्यात नवा रेकॉर्ड, Video ✦ ⚡ PAK vs ENG : 242 चं टार्गेट, पाकिस्तान 154-9… हृदयाचे ठोके थांबवणाऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानचा थ्रिलर चेस; इ… ✦ ⚡ पीएम किसानचा हप्ता ३० ऑक्टोबरला, पण ‘नमो’चे दोन हप्ते कधी येणार? सणासुदीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल ✦ ⚡ कोल्हापूर हादरलं! पत्नीनं झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घातला, कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट ✦ ⚡ Satara News: बंद दाराआड बैठक अन् खेळ पलटला! पृथ्वीराज चव्हाण-शंभुराज देसाई यांच्या भेटीनं खळबळ; साताऱ्यात र…
SP News Maregaon

मारेगावात उद्या आरोग्यसेवेचा महायज्ञ! मोफत शिबिरात सर्वरोग तपासणीसह शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विशाल किन्हेकार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन

मारेगाव | सुरेश पाचभाई

मारेगाव : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि गरजू रुग्णांना आजारांचे निदान व उपचाराची संधी मिळावी, या उद्देशाने शिवसेना (शिंदे गट) मारेगाव तालुकाप्रमुख विशाल किन्हेकार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी मारेगाव येथे मोफत सर्वरोग निदान, शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.नगरपंचायत कार्यालयाजवळील हनुमान मंदिराच्या प्रांगणात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
रक्तदाब, मधुमेहापासून हृदयरोगापर्यंत तपासणी
शिबिरात रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू, हर्निया, मूळव्याध, स्त्रीरोग, हाडांचे विकार, सांधेदुखी, हृदयरोग, बालरोग, कान-नाक-घसा, दंतविकार, दमा तसेच त्वचाविकारांसह विविध आजारांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेसंदर्भातही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
आधारकार्ड, रेशनकार्डची प्रत आणणे आवश्यक
शिबिराचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आधारकार्ड आणि रेशनकार्डची छायांकित प्रत सोबत आणावी, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. शिबिरासंदर्भातील अधिक माहितीसाठी संजय आवारी, धनराज भट, शुभम ठावरी, शंकर नागोसे किंवा प्रशांत भंडारी यांच्याशी संपर्क साधता येईल.
तालुक्यातील गरजू नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिरात सहभागी होऊन उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना शाखा, मारेगावच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर