ब्रेकिंग न्यूज
⚡ अवघ्या दहा वर्षांची लेक, घरात कुणी नसताना बापाचं भयंकर कृत्य, अंगावर थंड पाणी टाकलं अन्… छ. संभाजीनगरची घ… ✦ ⚡ अवघ्या दहा वर्षांची लेक, घरात कुणी नसताना बापाचं भयंकर कृत्य, अंगावर थंड पाणी टाकलं अन्… छ. संभाजीनगरची घ… ✦ ⚡ नाव जाहीर झालं पण डोळ्यावर विश्वास बसेना! ना वर्ल्ड कप जिंकवणारा यमाल, ना लिओनेल मेस्सी… कोण ठरला Ballon … ✦ ⚡ मारेगावात उद्या आरोग्यसेवेचा महायज्ञ! मोफत शिबिरात सर्वरोग तपासणीसह शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन ✦ ⚡ शिक्षणानंतर घेतला धाडसी निर्णय, सोलापूरच्या तरुणाच यशस्वी कुक्कुटपालन, महिन्याला 20 लाख उलाढाल ✦ ⚡ अभिनंदन! भारतानं मोडला अमेरिकेचा जागतिक विक्रम, ‘शंखनाद’ करण्यात नवा रेकॉर्ड, Video ✦ ⚡ PAK vs ENG : 242 चं टार्गेट, पाकिस्तान 154-9… हृदयाचे ठोके थांबवणाऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानचा थ्रिलर चेस; इ… ✦ ⚡ पीएम किसानचा हप्ता ३० ऑक्टोबरला, पण ‘नमो’चे दोन हप्ते कधी येणार? सणासुदीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल ✦ ⚡ कोल्हापूर हादरलं! पत्नीनं झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घातला, कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट ✦ ⚡ Satara News: बंद दाराआड बैठक अन् खेळ पलटला! पृथ्वीराज चव्हाण-शंभुराज देसाई यांच्या भेटीनं खळबळ; साताऱ्यात र…
SP News Maregaon

अवघ्या दहा वर्षांची लेक, घरात कुणी नसताना बापाचं भयंकर कृत्य, अंगावर थंड पाणी टाकलं अन्… छ. संभाजीनगरची घ…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर: बाप-लेकीचं नातं प्रेम आणि विश्वासाचं असतं. पण छत्रपती संभाजीनगरच्या मिसारवाडी भागातून एक भयंकर प्रकार पुढे आला आहे. एका बापानंच पोटच्या मुलीचा अमानुष छळ केला. अंगावर थंड पाणी टाकून तिच्या हातापायांना सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर तिच्या डोक्याच्या मागील बाजूचे केस कापून तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुलीच्या 24 वर्षीय भावाने सिडको पोलिसांत धाव घेतली. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी हा आपल्या पत्नीसोबत राहतो आणि पेंटरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याचे लहान भाऊ आणि दहा वर्षीय बहीण वडिलांसोबत राहतात. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.16 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या काकांनी त्याला फोन केला. पीडित मुलगी आणि तिचे वडील घरी दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर फिर्यादीने वडिलांच्या घरी जाऊन पाहणी केली; मात्र दोघेही तेथे आढळले नाहीत. त्यामुळे त्याने त्यांचा शोध सुरू केला.

तू बहिणीशी का बोललास? तरुणाला रात्रीच अडवलं, लोखंडी रॉड आणि कटरने…, छ. संभाजीनगरात खळबळ

‎जहागीर कॉलनी, जटवाडा रोड परिसरात राहणाऱ्या त्याच्या मावस बहिणीचा फोन आला. पीडित मुलगी तिच्याकडे आल्याचे तिने सांगितले. त्यानुसार फिर्यादी तेथे पोहोचला. भावाला पाहताच मुलगी रडू लागली. त्याने तिची विचारपूस केली असता, तिने स्वतःसोबत घडलेला प्रकार सांगितला.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास वडिलांनी तिच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढले. त्यानंतर तिच्या अंगावर थंड पाणी ओतून हातापायांना सिगारेटचे चटके दिले. तसेच तिच्या डोक्याच्या मागील बाजूचे केस कापून तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

‎बहिणीने सांगितलेला प्रकार ऐकल्यानंतर फिर्यादीने सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोपान नरळे करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर