बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Pakistan Thriller Victory Against England : पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या वनडे ट्राय सिरीजमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रावलपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये मॅच खेळवण्यात आली अन् या मॅचमध्ये पाकिस्तानने अशक्य असा विजय मिळवून दाखवला आहे. क्रिकेटच्या इतिहासात खूप कमी वेळा थरारक मॅच पहायला मिळतात. अशातच पाकिस्तानने सर्वात थ्रिलर रनचेस करून दाखवला आहे. 242 चं टार्गेट असताना 154 रनवर 9 विकेट्स गमावल्यानंतर पाकिस्तानचा पराभव जवळपास निश्चित मानला जात होता, परंतु शादाब खान आणि हॅरिस रौफ यांच्यातील ऐतिहासिक भागीदारीमुळे पाकिस्तानने 1 विकेटने सनसनाटी विजय मिळवला.
पाकिस्तानचा स्कोरकार्ड 154- 9
इंग्लंडने दिलेल्या 242 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत वाईट झाली. इंग्लंडच्या बॉलर्ससमोर पाकिस्तानचे अव्वल बॅटर्स सपशेल अपयशी ठरले. बाबर आझम (10), फखर झमान (10) आणि इतर फलंदाज पटापट आऊट झाले. 34 व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानचा स्कोरकार्ड 154- 9 अशी झाली होती. इंग्लंडच्या विजयावर फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी होतं. पण शाबादने हत्यार टाकलं नाही. त्याने आक्रमक शतक ठोकत मॅच जिंकून दिली.
1 minute 42 seconds of pure bliss.
As a cricket fan everyone should appreciate this exceptional innings by Shadab Khan !!
Well done Pakistan 🇵🇰 and their fans. Tonight is your time to celebrate
Shadab Khan has become a hero tonight and earned the respect of the cricketing fraternity for this amazing innings under extreme duress!
— Troll cricket unlimitedd (@TUnlimitedd) October 25, 2026
शादाब खानची एकाकी झुंज
9 विकेट्स पडल्यानंतर क्रीझवर आलेल्या शादाब खानने (113)* एकाकी झुंज देत इंग्लंडच्या बॉलर्सवर हल्लाबोल केला. त्याला 10 व्या क्रमांकावर आलेल्या हॅरिस रौफने संयमी साथ दिली. शादाबने प्रेशरमध्ये तुफानी फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केलं. या दोघांनी 10 व्या विकेटसाठी नाबाद 89 रनची वर्ल्ड रेकॉर्ड भागीदारी रचली, जी वनडेमध्ये यशस्वी पाठलाग करताना 10 व्या विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी ठरली.
Every ball of Shadab Khan and Haris Rauf’s Stellar Partnership
What a win by Pakistan!!!! https://t.co/tVceSjP90T
— PCT GEO News (@PakistanCrnrj) October 25, 2026
45 व्या ओव्हरला फिरली मॅच
दरम्यान, अखेरीस पाकिस्तानला विजयासाठी काही रनची गरज असताना, हॅरिस रौफने चौकार मारून संघात विजय मिळवून दिला. या 1 विकेटच्या थरारक विजयामुळे पाकिस्तानने या वनडे ट्राय सिरीजच्या फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. 45 व्या ओव्हरला मॅच इंग्लंडच्या बाजूने झुकली होती पण इथं इंग्लंडला नशीबाने साथ दिली नाही. त्यामुळे मॅचमध्ये नवा ट्विस्ट पहायला मिळाला होता.