ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगावात उद्या आरोग्यसेवेचा महायज्ञ! मोफत शिबिरात सर्वरोग तपासणीसह शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन ✦ ⚡ अभिनंदन! भारतानं मोडला अमेरिकेचा जागतिक विक्रम, ‘शंखनाद’ करण्यात नवा रेकॉर्ड, Video ✦ ⚡ PAK vs ENG : 242 चं टार्गेट, पाकिस्तान 154-9… हृदयाचे ठोके थांबवणाऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानचा थ्रिलर चेस; इ… ✦ ⚡ पीएम किसानचा हप्ता ३० ऑक्टोबरला, पण ‘नमो’चे दोन हप्ते कधी येणार? सणासुदीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल ✦ ⚡ कोल्हापूर हादरलं! पत्नीनं झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घातला, कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट ✦ ⚡ Satara News: बंद दाराआड बैठक अन् खेळ पलटला! पृथ्वीराज चव्हाण-शंभुराज देसाई यांच्या भेटीनं खळबळ; साताऱ्यात र… ✦ ⚡ Nashik News: हळद, धने अन् मिरची पावडरचं धक्कादायक वास्तव, दिवाळीआधी मुंढेंच्या टीमची मोठी कारवाई, नाशिकमध्य… ✦ ⚡ Pune Accident : कॉलेजला निघालेल्या ७-८ विद्यार्थिनी; बसची वाट बघत असतानाच अंगावर धावून आला काळ, भरधाव कारनं… ✦ ⚡ बुरांडा–खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका! ✦ ⚡ मार्डीच्या ‘न्यू युवा समता दुर्गोत्सव मंडळा’चा सामाजिक संदेश देणारा उपक्रम; विसर्जन मिरवणुकीतून पोलिसांच्या कार्याला सलाम!
SP News Maregaon

Satara News: बंद दाराआड बैठक अन् खेळ पलटला! पृथ्वीराज चव्हाण-शंभुराज देसाई यांच्या भेटीनं खळबळ; साताऱ्यात र…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विशाल पाटील, प्रतिनिधी, सातारा: राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या घडामोडींना मागील काही दिवसांत चांगलाच वेग आला आहे. राज्यातील ग्रामीण भागावर प्रभाव टाकणाऱ्या सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सातारा जिल्ह्यातही नवीन समीकरणे जुळताना दिसत आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील पकड मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीचा एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच शिवसेना नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात कराड येथे अत्यंत गुप्त आणि महत्त्वपूर्ण अशी बंद दाराआड बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या समीकरणांवर आणि जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातून माजी आमदार दीपक चव्हाण हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कराड पंचायत समितीचे सदस्य रवींद्र बडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, ज्यामुळे चुरस निर्माण झाली होती. मात्र, दोन्ही दिग्गज नेत्यांच्या या उच्चस्तरीय बैठकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आणि रवींद्र बडेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

माघार घेतल्यानंतर रवींद्र बडेकर यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून, त्याबाबतचे पत्रही त्यांना सुपूर्द केले आहे. काँग्रेस पक्षाच्या या धोरणात्मक भूमिकेमुळे आणि ऐनवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळे आता सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. या अनपेक्षित राजकीय निर्णयामुळे सातारा जिल्ह्याच्या सहकार वर्तुळात आणि राजकीय पटलावर जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर