ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

लग्न झालं, 8 महिन्यात नवरा गेला, सासू अन् दीराचं विधवा सुनेसोबत धक्कादायक कृत्य, कोल्हापुरला हादरवणारी घटना…

13 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका विधवा सुनेसोबत सासू आणि दीराने अमानुषतेचा कळस गाठला आहे. एकीकडे नवरा मेल्याचं दु:ख असताना सासू आणि दीराने महिलेला रस्त्यावर आणलं आहे. दोघांनी पतीच्या विम्याचे पैसे आणि पीएफ, ग्रॅच्युटीचे तब्बल ७० लाख रुपये लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी निकिता यांचा विवाह १६ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीधर पाटील यांच्याशी झाला होता. मात्र, दुर्दैवाने विवाहाच्या अवघ्या आठ महिन्यांनंतर श्रीधर यांचं निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्यांच्या विम्याची ५० लाख रुपये आणि भविष्य निर्वाह निधी (PF) व ग्रॅच्युइटीची २० लाख ५८ हजार रुपये अशी एकूण सुमारे ७० लाख रुपयांची रक्कम निकिता यांच्या बँक खात्यावर जमा झाली होती. आरोपींनी ४ एप्रिल २०२३ ते १५ जुलै २०२५ या कालावधीत ही मोठी रक्कम आपल्या बँक खात्यावर वळती केली आहे.
बँक अधिकाऱ्याशी संगनमत अन् बनावट खात्याचा खेळ
तक्रारीनुसार, निकिता यांचा दीर अनिरुद्ध हा एका बँकेत नोकरीस होता. त्याने अत्यंत हुशारीने त्याच बँकेत वहिनी निकिता यांच्या नावे एक खातं उघडलं. मात्र, या खात्यासाठी निकिता यांचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल न वापरता, अनिरुद्धने स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी नोंदवला. यानंतर, बँकेच्या तत्कालीन शाखा अधिकाऱ्याला हाताशी धरून अनिरुद्ध याने निकिता यांच्या कोऱ्या कागदपत्रांवर आणि बँक फॉर्मवर सह्या घेतल्या.

पहिल्या टप्प्यात आरोपी दीराने ३० लाख रुपये आई भारती सुरेश पाटील यांच्या खात्यावर वळवले. त्यानंतर पुन्हा २० लाख रुपये आईच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले. मात्र पतीच्या ग्रॅच्युइटीचे उर्वरित २० लाख ५८ हजार रुपये वळवण्याची प्रक्रिया सुरू असताना हा सर्व फसवणुकीचा प्रकार निकिता यांच्या लक्षात आला. आपल्याच हक्काचे पैसे सासू आणि दिराने बँक अधिकाऱ्याला सोबत घेऊन हडपल्याचे समजताच निकिता यांनी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाच्या आदेशानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सासू भारती सुरेश पाटील, दीर अनिरुद्ध पाटील आणि बँकेचे तात्कालीन शाखा अधिकारी अशा तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर