ब्रेकिंग न्यूज
⚡ एल निनोच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी धामणीत वनराई बंधाऱ्याची उभारणी! ✦ ⚡ काँग्रेसच्या महिला खासदाराला बसमध्ये मारली चापट, खासदार श्यामकुमार बरवेंकडून धक्कादायक प्रकार, VIDEO व्हायर… ✦ ⚡ पतीचा छळ असह्य, आधी विष केलं प्राशन, नंतर गॅलरीतून उडी , विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू, ‎‎छत्रपती संभाजीन… ✦ ⚡ ST Workers Protest | एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा! प्रमुख मागण्या काय? ✦ ⚡ शेतीला जोडधंदा म्हणून केलं शेळीपालन, शेतकऱ्याची आता वर्षाला 10 लाख कमाई, सांगितला यशाचा मंत्र ✦ ⚡ Pune : लंडनवरून येऊन पुण्यात लपली, पण मृत्यूच्या आधी मुग्धाचं ‘उस्मानपुरात’ कनेक्शन? Blinkit च्या एका पेमें… ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 2 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Rahul Gandhi | CM Fadnavis ✦ ⚡ Australia Cricket : 8 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया टीममध्ये फिरली भाकरी! ODI आणि T20 टीमची घोषणा, नव्या चेहऱ्यांना… ✦ ⚡ दुष्काळी बीडच्या शेतकऱ्याची कमाल, 3 एकरात लावलं पैशाचं पीक, योग्य नियोजन अन् वर्षात मालामाल, Video ✦ ⚡ दिवसा काम करून रात्र शाळेत शिकायचा, बारावीचा पेपर अवघड गेला अन्…, ‘ते’ दृश्य पाहून आईचा आक्रोश, सांगलीत ह…
SP News Maregaon

काँग्रेसच्या महिला खासदाराला बसमध्ये मारली चापट, खासदार श्यामकुमार बरवेंकडून धक्कादायक प्रकार, VIDEO व्हायर…

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वर्तुळाला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामटेकचे काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बरवे यांनी एका महिला खासदाराला चापट मारली आहे. दिल्लीत एका बस प्रवासादरम्यान हा प्रकार घडला असून ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका महिला खासदाराला अशाप्रकारे चापट मारल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होताना दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
खरं तर, १ नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीत एका रॅलीचं आयोजन केलं होतं. यासाठी देशभरातील सर्व खासदारांना रॅलीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होतं. निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ही रॅली काढली होती. यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक खासदार, नेते दिल्लीत उपस्थित झाले होते. रामटेकचे खासदार श्यामकुमार बरवे देखील या रॅलीसाठी दिल्लीला गेले होते.

दरम्यान, काँग्रेस काही खासदार एका बसमधून जात होते. दरम्यान श्यामकुमार बरवे यांनी एका महिला खासदाराला हळुवारपणे चापट मारली. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित महिला खासदारांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्या श्यामकुमार बरवे यांच्याकडे रागाने बघत असल्याचं दिसून आलं.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी या व्हिडिओ संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसच्या खासदाराच्या वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. त्यामुळे बरवे यांच्या वर्तनाबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी ईमेल मध्ये केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या व्हिडिओबाबत काँग्रेस श्रेष्ठी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर