बातमी ऐका (Marathi Voice Reader)
कोल्हापूर: बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव चारचाकी घुसल्याने एकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राधानगरीत घडली होती. जुलै 2025 मध्ये विद्यार्थिनीच्या मृत्यूस कारणभूत ठरलेल्या तरुणाचं आणखी एक विकृत कृत्य पुढं आलं असून कोल्हापुरात संताप व्यक्त होतोय. राजवर्धन सुरेश परीट (वय 18) याच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘माझ्या रूमवर भेटायला ये, अन्यथा ChatGPT च्या माध्यमातून तयार केलेले फोटो व्हायरल करेन’, अशी धमकी राजवर्धन याने संबंधित मुलीला दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परीट हा 2024 पासून महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला त्रास देत आहे. तसेच प्रेम व्यक्त करत वारंवार गाडी अडवून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप त्याच्यावर आहे.
आई-वडील भात कापणीच्या कामात व्यस्त; मागे बागडत होती 3 वर्षांची चिऊ, क्षणात सगळं संपलं
दरम्यान, मुलीला रूमवर भेटायला बोलावले. तसेच न आल्यास चॅट जीपीटवरून बनवलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर असून याबाबत राधानगरी पोलिसांत तक्रार दाखल झाली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी राजवर्धन परीट याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याविरोधात विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
जुलै 2025 मध्ये भरधाव कारने घेतला जीव
राजवर्धन परीट याच्याच संबंधित अपघाताची घटना जुलै 2025 मध्ये घडली होती. बसची वाट पाहात थांबलेल्या शालेय विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव कार घुसली होती. यामध्ये एका विद्यार्थिनीला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात देखील परीटचे नाव समोर आले होते. मात्र, तो अल्पवयीन असल्याने त्याच्यावर आरोपीप्रमाणे कारवाई झाली नव्हती.
आता परीटने अल्पवयीन मुलीला त्रास देत अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. आता या तक्रारीमुळे पुन्हा तो पोलिसांच्या कारवाईच्या कक्षेत आला आहे. त्याच्या या विकृत कृत्याने संताप व्यक्त होत आहे.