ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

कापूस-सोयाबीननं रडवलं, पिवळ्या सोन्यानं बदललं नशीब! एका एकरात 600000 कमाई करणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट

10 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


"वर्षानुवर्षे आम्ही शेतात राब राब राबलो… पण हातात काय पडायचं? सतत बदलणाऱ्या हवामानामुळे होत नव्हते ते पिकही जायचं, आलंच पिक तर बाजारभाव मिळायचा नाही. मग काय शेतकऱ्यानं एक युक्ती केली, कापूस आणि सोयाबीन या पारंपारिक पिकाला बाजूला ठेवून प्रयोग म्हणून हळद लावून पाहिली. काय आश्चर्य त्याचं नशीब बदललं. एक ते सव्वा एकरमध्ये घेतलेल्या पिकानं जवळपास 6 लाखहून अधिक उत्पन्न मिळालं.

पिवळ्या सोन्यानं बदललं नशीब
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील उकळी गावच्या शेतकऱ्यांने तर कमालच केली. तिथल्या शेतकऱ्यांनी हळद या नगदी पिकाचा प्रयोग केला, तेव्हा त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. आपला अनुभव सांगताना उकळी येथील प्रयोगशील शेतकरी किशोर सोनोने म्हणाले, "पूर्वी सोयाबीन आणि कापूस लावून आम्ही थकलो होतो. उत्पादन खर्चही निघत नव्हता. म्हणून मी धाडस करून सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सव्वा एकरात हळद लावली. अन् काय सांगू… या लहानशा शेतातून मला तब्बल ४३ क्विंटल हळद मिळाली! १२,५०० रुपये प्रति क्विंटल या दराने माझ्या हातात ६ लाख २५ हजार रुपये आले. एवढंच नाही, तर पुढच्या लागवडीसाठी लागणारे २० क्विंटल ओले बेणेसुद्धा घरातच तयार झाले."

पहिल्याच प्रयोगानं मिळालं यश
या पहिल्याच प्रयोगाने मिळालेल्या घवघवीत यशानंतर किशोर सोनोने यांनी आता अडीच एकरात हळद लागवड केली आहे. "आता शेतीत पैसा उरू लागलाय अन् हातात खणखणीत रोकड खेळू लागलीय," असे ते अत्यंत अभिमानाने सांगतात. पूर्वी पिकांचे नुकसान झाल्यावर खर्चासाठी शेतकऱ्यांना सावकारांच्या उंबरठ्यावर जावे लागायचे. कित्येकांच्या जमिनी आणि घरे सावकारांच्या घशात गेली होती. मात्र, हळदीच्या भरघोस उत्पन्नामुळे गावे आता पूर्णपणे सावकारीमुक्त झाली आहेत.

ज्या गावात कधी ट्रॅक्टरही नव्हता तिथे आज सुबत्ता
ज्या उकळी-सुकळी गावात पूर्वी एकही ट्रॅक्टर नव्हता, तिथे आज हळदीच्या जीवावर शेतकऱ्यांनी ४५० हून अधिक ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. जुनी मातीची घरे पाडून टोलेजंग पक्की घरे बांधली आहेत. खिशात पैसा आल्यामुळे शेतकऱ्यांची मुले आता मेहकरच्या नामांकित CBSE शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण घेत आहेत. किशोर सोनोने यांचा हा यशस्वी प्रयोग पाहून गावातील इतर शेतकरीही आता सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्र कमी करून हळदीकडे वळत आहेत. मेहकर तालुक्यात एकूण ८४ हजार हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. त्यात गतवर्षी २,७०० हेक्टरवर असलेला हळदीचा पेरा यंदा ३,५०० हेक्टरवर पोहोचला आहे. शेतकरी आता कमी नफा देणाऱ्या सोयाबीनकडून हळदीकडे वळत आहेत.

कृषी अधिकारी काय म्हणाले?
विशेष म्हणजे, आता मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीतच हळदीची खरेदी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना लांब जाण्याची गरज उरलेली नाही. "वाहतुकीचा खर्च वाचल्यामुळे आणि गावातच हक्काचा भाव मिळत असल्यामुळे आमचा नफा आणखी वाढला आहे," असा आनंद येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.

या बदलावर बोलताना कृषी अधिकारी किशोर काळे यांनी सांगितले की, "पूर्वी हळदीसाठी स्थानिक बाजारपेठ नव्हती, त्यामुळे सांगली किंवा नांदेडला माल न्यावा लागायचा. मात्र, या वर्षापासून मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीतच हळद खरेदी सुरू झाली आहे." स्थानिक पातळीवर खरेदी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचणार असून हळद लागवडीला आता अधिक चालना मिळत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर