ब्रेकिंग न्यूज
FDA Raid Tukaram Mundhe: खाण्या-पिण्यापूर्वी १० वेळा विचार करा! एक्सपायरी डेट बदलून विकला जाणारा ७५ लाखांचा… Ankit Baliyan : युट्यूबर अंकित बालियानच्या हत्येनंतर फौजी बापाचा 96 तासांचा अल्टिमेटम! पोलिसांनी 48 तासात व… पारंपरिक शेतीतीत अनिश्चितता, शेतकऱ्यानं घेतला देशी कुक्कुटपालन करण्याचा निर्णय, महिन्याला 7 लाखांची उलाढाल दूध द्यायला गेले अन् मोठा भाऊ आढळला मृत, अर्ध्या तासात धाकट्यानेही सोडले प्राण, लातूरमधील मन सुन्न करणारी घ… 2 वर्ष शारीरिक संबंध, मंगळसूत्र बांधूनही लग्नाला टाळाटाळ, ब्युटीशियनने फसवणूक झाल्याचे कळताच थेट… अवघ्या 20 दिवसांपूर्वी लव्ह मॅरेज, पतीला वेगळाच संशय, मित्रासह स्मशानभूमीत नेलं, भयंकर कृत्यानं चंद्रपूर हा… अवघ्या 20 दिवसांपूर्वी लव्ह मॅरेज, पतीला वेगळाच संशय, मित्रासह स्मशानभूमीत नेलं, भयंकर कृत्यानं चंद्रपूर हा… मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं … रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेचा संकल्प; शिवसेना उबाठाचे वणीतील कौटुंबिक स्नेहमिलन उत्साहात 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा
SP News Maregaon

Ankit Baliyan : युट्यूबर अंकित बालियानच्या हत्येनंतर फौजी बापाचा 96 तासांचा अल्टिमेटम! पोलिसांनी 48 तासात व…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Ankit Baliyan Murder Case : हरियाणवी अभिनेता आणि युट्यूबर अंकित बालियान हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून पोलीस या प्रकरणात मारेकऱ्यांच्या शोधात होते, पण त्यांना काहीच आरोपींची काहीच लिंक लागत नव्हती. अशातच या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 कथित आरोपींचा इन्काऊंटर केल्याचं समोर आलं आहे. त्याआधी अंकितच्या वडिलांनी पोलिसांना 96 तासाचा अल्टिमेटम दिला होता.
48 तासात आरोपींचा गेम ओव्हर
पोलिसांच्या कारवाईवर अंकितच्या फौजी वडिलांनी नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना 96 तासात शोधून काढावं, अशी मागणी अंकितच्या कुटूंबियांकडून होत होती. अशातच पोलिसांनी 48 तासात अंकितच्या आरोपींचा गेम ओव्हर केला. अंकित बलियानच्या हत्या प्रकरणात पोलीस आणि एसटीएफने चकमकीत दोन शूटरचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. आतापर्यंत तपासात हत्याकांडाशी निगडित 6 आरोपी समोर आलेत. चकमकीत मारले गेलेले आरोपी अंकित बालियान याच्या घराची रेकी आणि त्याचा पाठलाग करताना आढळले होते.
पूर्ण न्याय मिळणं बाकी – अंकितचे वडील
पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरनंतर अंकित बालियानच्या वडिलांनी समाधान व्यक्त केलंय. पोलिसांनी एक चांगलं काम केलं आहे. सध्यापुरता अर्धा न्याय मिळाला आहे. पूर्ण न्याय मिळणं बाकी आहे. उरलेले आरोपी दोन, तीन, चार, कितीही असोत, त्यांना ठार मारले पाहिजे, अशी मागणी अंकितच्या वडिलांनी केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ठार झालेल्या शूटरपैकी मोहितवर 14 गुन्हे दाखल होते, तर सुमितवर 1 गुन्हा होता.
दोन्ही आरोपी चकमकीत ठार
निगडित 6 आरोपींपैकी एक आरोपी याआधीच हत्येच्या आरोपात जेलमध्ये गेला होता. तर इतर तिघांविरोधात विविध गुन्हे नोंद आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे मोहित, सुमितला ट्रॅक करण्यात आलं. कैराना रोडवरील इंडियन गॅस गोदामाजवळ दोन्ही आरोपी चकमकीत ठार झाले. दोन्ही आरोपींकडून 2 पिस्तुल, जिवंत कारतूस, एक दुचाकी, मोबाईल फोन आणि 5 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर