ब्रेकिंग न्यूज
FDA Raid Tukaram Mundhe: खाण्या-पिण्यापूर्वी १० वेळा विचार करा! एक्सपायरी डेट बदलून विकला जाणारा ७५ लाखांचा… Ankit Baliyan : युट्यूबर अंकित बालियानच्या हत्येनंतर फौजी बापाचा 96 तासांचा अल्टिमेटम! पोलिसांनी 48 तासात व… पारंपरिक शेतीतीत अनिश्चितता, शेतकऱ्यानं घेतला देशी कुक्कुटपालन करण्याचा निर्णय, महिन्याला 7 लाखांची उलाढाल दूध द्यायला गेले अन् मोठा भाऊ आढळला मृत, अर्ध्या तासात धाकट्यानेही सोडले प्राण, लातूरमधील मन सुन्न करणारी घ… 2 वर्ष शारीरिक संबंध, मंगळसूत्र बांधूनही लग्नाला टाळाटाळ, ब्युटीशियनने फसवणूक झाल्याचे कळताच थेट… अवघ्या 20 दिवसांपूर्वी लव्ह मॅरेज, पतीला वेगळाच संशय, मित्रासह स्मशानभूमीत नेलं, भयंकर कृत्यानं चंद्रपूर हा… अवघ्या 20 दिवसांपूर्वी लव्ह मॅरेज, पतीला वेगळाच संशय, मित्रासह स्मशानभूमीत नेलं, भयंकर कृत्यानं चंद्रपूर हा… मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं … रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेचा संकल्प; शिवसेना उबाठाचे वणीतील कौटुंबिक स्नेहमिलन उत्साहात 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा
SP News Maregaon

पारंपरिक शेतीतीत अनिश्चितता, शेतकऱ्यानं घेतला देशी कुक्कुटपालन करण्याचा निर्णय, महिन्याला 7 लाखांची उलाढाल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर : शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील आनंद जाधव यांनी देशी कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी केला आहे. पारंपरिक शेतीतील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यांनी हा पूरक व्यवसाय सुरू केला. आता यामधून 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल महिन्याला होत आहे.

शेतकरी आनंद जाधव यांनी दोन वर्षांपूर्वी देशी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. बाजारात देशी कोंबड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी केवळ 8 ते 10 कोंबड्यांपासून या व्यवसायाची सुरुवात केली. जाधव यांनी योग्य संगोपन, लसीकरण आणि आहार व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. नैसर्गिक वातावरणात कोंबड्यांची जोपासना केल्यामुळे त्यांच्या पक्ष्यांची संख्या आणि गुणवत्ता वाढली. कमी भांडवलात सुरू केलेला हा प्रयोग आता एका मोठ्या उद्योगात रूपांतरित झाला आहे.

आर्थिक उलाढाल

सध्या आनंद जाधव यांच्या देशी कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून दरमहा 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. त्यांची मेहनत, बाजारपेठेचा अभ्यास आणि चिकाटी यामुळे त्यांना हे यश मिळाले आहे.

इतरांसाठी प्रेरणा

आनंद जाधव यांचा हा यशस्वी प्रवास मोहोळ परिसरातील आणि जिल्ह्यातील इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायाची कास धरल्यास ग्रामीण भागातही रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर