ब्रेकिंग न्यूज
⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा… ✦ ⚡ नागपूर हळहळलं! भरधाव ट्रेलरने कुटुंबाला चिरडलं, पती-पत्नीसह 4 वर्षीय चिमुकल्याचा जागीच अंत ✦ ⚡ महिलांसाठी महत्त्वाची बातमी, लगेच अर्ज करा आणि शेतकरी प्रमाणपत्र घ्या, सरकारी योजनांचा थेट लाभ ✦ ⚡ गाडी पार्किंगवरून वाद, मध्यस्थी करणाऱ्यालाच संपवलं, मामा-भाच्यासह सहा जणांवर गुन्हा, सोलापुरात खळबळ ✦ ⚡ औंढा नागनाथ मंदिर एक महिना बंद राहणार, भाविकांना 5 ऑक्टोबरपासून दर्शन नाही, कारण… ✦ ⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच…
SP News Maregaon

गाडी पार्किंगवरून वाद, मध्यस्थी करणाऱ्यालाच संपवलं, मामा-भाच्यासह सहा जणांवर गुन्हा, सोलापुरात खळबळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर : घरासमोर गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असणारा वाद सोडवायला गेलेल्या मध्यस्थालाच जीव गमवावा लागला. सोलापुरातील टेंभुर्णी शहरात ही धक्कादायक घटना घडली. नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय 41, रा. वेणेगाव, ता. माढा) असे मृताचे नाव आहे. क्षुल्लक कारणावरून चाकू भोसकून आणि कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनं परिसर हादरला असून खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मृत नागनाथ जाधव यांचा भाऊ महेश मच्छिंद्र जाधव यांनी टेंभुर्णी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार मामा-भाच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केले आहे. राज कदम, समाधान चौधरी (दोघे रा. टेंभुर्णी, ता. माढा), सागर कुटे (रा. वेणेगाव, ता. माढा), रणजीत विलास पवार (वय-28, रा. शिवाजीनगर, टेंभुर्णी, ता. माढा), प्रतिक नागनाथ बागवाले (वय-22, रा. बागवालेवस्ती, टेंभुर्णी, ता. माढा) या संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील रणजीत विलास पवार व प्रतिक नागनाथ बागवाले या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णीतील नाळेवस्ती येथे सद्दाम पटवारी यांच्या घरासमोर पार्किंग जागेवरून वाद सुरू होता. 1 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास राज कदम आणि सद्दाम पटवारी यांच्यात भांडण वाढले. तेव्हा नागनाथ जाधव हा नाळे वस्ती परिसरात गेला होता. तो हा वाद सोडवण्यासाठी मध्ये गेला. तो भांडण सोडवण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला राज कदम, समाधान चौधरी, सागर कुटे, रणजीत पवार व इतर अनोळखी दोघांनी शिवीगाळ सुरू केली.

आरोपींनी नागनाथ जाधव याला खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर समाधान चौधरी व सागर कुटे यांनी चाकूने पाठीत व मांडीवर भोसकून जबर वार केले. जीवे मारण्याच्या हेतूने केलेल्या हल्ल्यात घाव वर्मी लागले. यात नागनाथ जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी सद्दाम पटवारी यांना देखील मारहाण करण्यात आली. त्यानंतर आय-20 कार व टाटा एंट्रा मधून मारेकरी घटना स्थानावरून पळून गेले.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या नागनाथ जाधव यांना तातडीने टेंभुर्णी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी अकलूजला हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी करमाळा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्हि.एस, सपोनी भुजबळ आदींनी भेट दिली आहे. याबाबत मृताचा भाऊ महेश मच्छिंद्र जाधव (वय-39 वर्षे, रा.वेणेगाव) याने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर