ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू, नातेवाईकांकडून सासूला चोप, ‘ते’ दृश्य पाहून सगळेच रडले, सांगलीत मन सुन्न क…

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सांगली: दीड वर्षाच्या चिमुकलीसह गर्भवती विवाहितेचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू  झाला. सांगलीतील मायथळ (ता. जत) गावात ही हृदयद्रावक घटना घडली. नीता गजानन सोलनकर (वय 29) आणि अवनी गजानन सोलनकर (वय दीड वर्ष) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कौटुंबिक कलहातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. मायलेकींच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास तीन वर्षांपूर्वी नीता यांचा गजानन आप्पासाहेब सोलनकर यांच्याशी विवाह झाला होता. गजानन खासगी वाहनचालक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून किरकोळ वाद झाल्याची प्राथमिक माहिती असून मंगळवारी सकाळी नीता आणि चिमुकली अवनी यांचा मृतदेह विहिरीत आढळला. कौटुंबिक वादातून त्यांनी विहिरीत आत्महत्या केल्याचा संशय आहे.

अंगणात बिबट्या, दारात कुत्रा आणि घरात आजी-आजोबा; नातीनं वाचवले तीन जीव, सांगलीत थरार

घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक धसाडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या सूचनेनुसार सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने विहिरीत शोधमोहीम राबवली. रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्नानंतर आई-मुलीचे मृतदेह बाहेर काढले.

हृदय पिळवटून टाकणारं दृश्य

रेस्क्यू पथकाने मायलेकींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. यावेळी दोन्ही मृतदेह ओढणीने एकमेकींना बांधलेल्या अवस्थेत होते. हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच ते स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नातेवाईकांकडून सासूला मारहाण

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी नीता यांची सासू रखूबाई आप्पासाहेब सोलनकर यांना मारहाण केली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असणारे पती गजानन सोलनकर यांनी तिथून पळ काढला. गजानन हे फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर