ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

12 हजारांचा मोहफुलांचा सडवा जप्त, एकावर गुन्हा

प्रमोद रा.मेश्राम मारेगाव तालुका प्रतिनिधी

मारेगाव, दि. 4 जून अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात मारेगाव पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत ग्राम सोनुपोड (सराटी) परिसरात छापा टाकून मोहफुलांच्या सडव्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन मारेगावचे पोलीस शिपाई विकास भास्कर खंदारे यांच्या फिर्यादीवरून मंतु गुलाराम आत्राम (वय 32, रा. सोनुपोड, ता. मारेगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (क) व (फ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मारेगाव पोलिसांचे पथक सराटी बिट परिसरात गस्त घालत असताना सोनुपोड फाट्याजवळील शेत परिसरात छापा टाकण्यात आला.

यावेळी शेतालगतच्या नाल्यात लपवून ठेवलेले 15 प्लास्टिक कॅन आढळून आले. पंचासमक्ष तपासणी केली असता प्रत्येक कॅनमध्ये 15 लिटरप्रमाणे एकूण 225 लिटर मोहफुलांचा सडवा असल्याचे निष्पन्न झाले.जप्त करण्यात आलेल्या सडव्याची किंमत 11 हजार 250 रुपये असून प्लास्टिक कॅनची किंमत 750 रुपये आहे. अशा प्रकारे एकूण 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सडव्याचा नमुना रासायनिक विश्लेषणासाठी सीलबंद करून पाठविण्यात आला असून उर्वरित सडवा पंचासमक्ष नष्ट करण्यात आला.प्राथमिक तपासात आरोपी गावठी दारू निर्मिती व विक्रीच्या उद्देशाने हा सडवा साठवून ठेवत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चित्ता उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दरवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ता किनाके, दिगंबर किनाके, पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत कोरवते, पोलीस शिपाई विकास खंदारे तसेच महिला पोलीस अंमलदार अरुणा पायलवार यांनी संयुक्तपणे पार पाडली.

अवैध दारू व्यवसायाविरोधातील मारेगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांचा करडा वचक पुन्हा अधोरेखित झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर