ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

रेतीची अवैध तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त

118 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पोलीस प्रशासनाची  कारवाई

सुरेश पाचभाई मारेगांव,


मारेगाव: तालुक्यातील रेती घाटातुन अवैधपणे रेतीची मोठया प्रमाणावर  तस्करी राजरोसपणे सुरु आहे. यावर वारंवार आळा घालण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु मुजोर रेतीचोर मात्र प्रशासनाला न जुमानता रेती तस्करी करीत आहे.अशातच दी.13 फेब्रुवारी 2024 च्या रात्री पोलीस प्रशासनाने अवैध रेतीची वाहतूक करणारा एक  ट्रॅक्टर जप्त केला आहे.या धडाकेबाज कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

तालुक्यात होत असलेली रेतीची अवैध वाहतूक ही प्रशासनाला आव्हान ठरलेली आहे.अवैध रेतीची रात्र -दिवस वाहतूक सुरु असल्याच्या माहितीवरून मारेगांव पोलीसांनी दी.13 फेब्रुवारी 2024 च्या मध्य रात्री 1 वाजता दापोरा ते चिंचमंडळ परिसरात ट्रॅप रचला. यात एक व्यक्ती ट्रॅक्टरने रेतीची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्याने लगेच मारेगाव पोलिस चिंचमंडळ येथे रवाना झाले.

त्यांना चिंचमंडळ ते दापोरा येथे वाळू ची अवैध वाहतूक करणारा MH-30-AB-6686 एक ट्रॅक्टरच्या मुंडक्याच्या नंबर आहे ट्रॉलीवर नंबर नाही असे वाहन पोलीस प्रशासनाने पकडले असून ज्ञानेश्वर भगवान नारनवरे राहणार खैरी ता.राळेगाव अशी जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकांचे नाव असून सदर ट्रॅक्टर मारेगाव येथील पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.सदरची कारवाई मारेगाव येथील पोलीस विभागाचे ए.एस.आय प्रमोद जिड्डेवार, पो.हे.का रजनीकांत शंकर पाटील यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर