ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

फिस्की जंगलात थरारक दरोडा!

9 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दुचाकीस्वाराला लक्ष्य करत ३ लाखांवर डल्ला; मारेगाव तालुक्यात खळबळ

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील ग्राम मछिंद्रा ते बांबर्डा दरम्यान असलेल्या फिस्की जंगल परिसरात सोमवारी (दि. ६ एप्रिल) रात्री सुमारे ८.५० वाजताच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील ३ लाख रुपये व कागदपत्रे हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन विजय चिंचोलकर (वय २५, रा. चोपन, ता. मारेगाव) हे वणी येथून जमीन खरेदीसाठी ३ लाख रुपये उसने घेऊन मोटारसायकलने नांदेपेरा मार्गे मार्डीकडे येत होते. दरम्यान, मछिंद्रा–बांबर्डा मार्गावरील हनुमान मंदिराजवळील जंगल परिसरात मागून आलेल्या रेसर बाईकवरील तिघा अज्ञात इसमांनी त्यांना लक्ष्य केले.

त्यातील एका इसमाने फिर्यादीच्या मोटारसायकलच्या सायलेंसरला लाथ मारल्याने त्यांचा तोल गेला. त्याच वेळी दुसऱ्या इसमाने मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली ३ लाख रुपये व कागदपत्रे असलेली कापडी पिशवी हिसकावून घेतली. घटनेदरम्यान फिर्यादीला धक्का लागून त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली. आरोपी घटनास्थळावरून मार्डीच्या दिशेने पसार झाले.

या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर,पोलीस उपनिरीक्षक प्रविण सुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर किनाके, पोलीस चालक अतुल सरोदे करीत आहेत.

पोलीसांनी नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठी रोकड वाहून नेताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर