बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई : बांगलादेशचा क्रिकेटपटू तौहिद हिरदॉयने इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या बांगलादेशच्या तौहिदने ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा तौहिद बांगलादेशच्या इतिहासातला फक्त तिसरा खेळाडू आहे. याआधी रकीबुल हसनने 2007 साली 313 रनची तर तमीम इक्बालने 2020 साली 334 रन केले होते. या दोन्ही ट्रिपल सेंच्युरी बांगलादेशमध्येच केलेली होती, पण तौहिद हिरदॉय बांगलादेशचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने परदेशामध्ये जाऊन हा विक्रम केला.
बांगलादेश ए ची टीम सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दुसऱ्या अनधिकृत टेस्टच्या चौथ्या दिवशी तौहिदने आपलं त्रिशतक पूर्ण केलं. 450 बॉलमध्ये तो 300 रनवर पोहोचला.
350 रन करून घोषित केली इनिंग
या सामन्यात तौहिद हिरदॉय बांगलादेशच्या टीमचं नेतृत्व करत आहे. 350 रनवर नाबाद असताना त्याने स्वत:ची इनिंग घोषित केली. त्याच्याकडे 400 रन करण्याची चांगली संधी चालून आली होती, पण त्याने इनिंग घोषित करण्याचा निर्णय घेतला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधली कोणत्याही बांगलादेशी खेळाडूची ही सगळ्यात मोठी इनिंग होती. 481 बॉलवर हिरदॉयने 27 फोर आणि 10 सिक्सच्या मदतीने 350 रन कले.
300 UP!!!
What an immense innings from Towhid Hridoy!!
1st Bangladeshi to smash 300 vs an SA side!
And it was FLAWLESS!!@BCBtigers @ProteasMenCSA https://t.co/hCQuakXI7H pic.twitter.com/kihlsHtzhG
— Bhubesi(@MpenduloTweets) September 2, 2026
दक्षिण आफ्रिकेने केल्या 512 रन
दक्षिण आफ्रिका ए ने या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये 512 रन केले होते. विकेट कीपर सिनेथेम्बा क्वेशिलने 128 रनची खेळी केली तर ओपनर लेसेगो सनोकवाने याने 111 रन केले. बांगलादेशकडून नईम हसनने 4 आणि हसन मुरादने 3 विकेट घेतल्या. बांगलादेशने 8 विकेटवर 676 रन करून डाव घोषित केला. तौहिद हिरदॉयशिवाय बांगलादेशचा विकेट कीपर जाकेर अलीने 94 आणि फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर मोहम्मद सैफुद्दीनने 87 रनचं योगदान दिलं. दोन सामन्यांच्या या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका ए ने पहिली मॅच इनिंग आणि 413 रननी जिंकली होती.