बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Who is Jhandu Kumar bronze medal in CWG 2026 : देशासाठी खेळण्याचं स्वप्न प्रत्येक भारतीय खेळाडूंचं असतं. देशासाठी मेडल पटकवण्यासाठी खेळाडू दिवसरात्र मेहनत घेतात. अशातच आता याच कष्टाचं फळ कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताच्या खात्यात पहिलं मेडल आलं आहे. पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत झंडू कुमारने भारताला पहिलं मेडल जिंकून दिलंय. झंडू कुमारने ब्रॉन्झ मेडल पटकावून देशाचं नाव उंचावलं आहे. 28 वर्षाच्या या पठ्ठ्यानं पोलिओ आणि आर्थिक अडचणी अडचणींवर मात करत ब्रॉन्ड मेडल मिळवून दाखवलं. पण झंडू कुमारची कहाणी तुम्हाला माहितीये का?
झंडू कुमारने सांगितली स्ट्रगल स्टोरी
मी दररोज भाजीपाला खरेदी करण्यासाठी बिहार शरीफला जवळपास 20 किमीचा प्रवास करायचो, भाजीपाला घेऊन परत माझ्या गावाकडं येयचो आणि बाजारात विकायचो. सगळं काम होईपर्यंत दिवस संपायचा. संध्याकाळी 4 च्या सुमारास काम संपल्यानंतर मी व्यायामासाठी जिममध्ये जायचो, असं झंडू कुमारने म्हटलं सांगितलं. भाजीपाला विकल्यानंतर मला दिवसाला 400 ते 500 रुपये मिळायचे. पण तेही मला पुरत नव्हते कारण प्रोटीन सप्लिमेंट्स मिळवण्याची 1000 रुपये खर्च करावे लागायचे. माझ्यासाठी व्यायाम आणि डाएट हे मोठं आव्हान होतं, असंही झंडू सांगतो.
Vaibhav sooryavanshi : 15 वर्षाच्या वैभवला चुकीची वागणूक, ‘मुर्ख’ म्हणत BCCI च्या माजी सिलेक्टरने गंभीरला धरलं जबाबदार! काय म्हणाले?
स्पर्धेत भाग घेण्यासाठी ई-रिक्षा विकली
भाजीपालाचा धंदा परवडत नसल्याने ई-रिक्षा घेतली. ई-रिक्षा चालवायला सुरुवात केल्यावर गोष्टी आणखी कठीण झाल्या. जास्त तास काम केल्यामुळे थकवा वाढला अन् त्याला जीमला वेळ देता येत नव्हता. राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी मी 2023 मध्ये माझी ई-रिक्षा विकली. त्यानंतर त्याच्यावर पुन्हा गरिबीचं संकट आलं. पुन्हा नव्या जोशाने त्याने भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला.
First medal in the bag!
Jhandu Kumar powers #TeamIndia to its first medal at Glasgow 2026 with successful lift of 181kg and 190kg in the men’s heavyweight category of para powerlifting.
Watch the Commonwealth Games Glasgow 2026, today from 12:30 PM onwards, LIVE & EXCLUSIVE… pic.twitter.com/g070WNPoAJ
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 24, 2026
आयुष्याचा टर्निंग पाईंट…
दिल्लीच्या स्पर्धेत झंडूच्या कामगिरीने पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षक राजिंदर सिंग राहेलू यांचं लक्ष वेधून घेतलं, ज्यांनी त्याला गांधीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले. त्याच्यासाठी हा टर्निंग पाईंट ठरला. नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये रौप्य पदक जिंकलं अन् सगळ्यांना आपली क्षमता दाखवून दिली. त्यानंतर त्याने प्रिलमध्ये बँकॉक येथे झालेल्या एशिया-ओशनिया ओपन पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमधील कांस्य पदक देखील पटकावलं.
एक दिवस मी यशस्वी होईन…
दरम्यान, मला असे लोक भेटले ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिलं. माझा नेहमीच विश्वास होता की, जर मी पुरेशी मेहनत केली, तर मी काहीतरी नक्कीच मिळवीन. आर्थिक पाठबळ नेहमीच उपलब्ध नव्हतं, पण माझा स्वतःवर विश्वास होता. मी स्वतःला सतत सांगत राहिलो की एक दिवस मी यशस्वी होईन, असंही झंडू कुमार याने स्पर्धेपूर्वी म्हटलं होतं.