ब्रेकिंग न्यूज
मुंबईतून कोकणचा प्रवास सोपा, आता रोज धावणार CSMT-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, वेळापत्रक, थांबे आणि संपूर्ण माह… Sachin Tendulkar : ‘मी बाप्पासाठी…’, मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीचं कारण काय? सचिन तेंडूलकरची पहिली प्र… Onion Rate : कांदा आता लोकांना रडवणार, शेतकऱ्यांना हसवणार, भाव वाढणार! Antarwali Sarati News | अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी आंदोलक ताब्यात! काय घडलं? Sreesanth Sanju Samson Controversy : हँडशेक सोडा, एकमेकांकडं बघितलंही नाही! संजू सॅमसन अन् श्रीसंत यांच्यात… पंढरपूरच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! गावात बांधला ‘सोन्या’चा बंगला, Video पाहाल तर कौतुकच कराल! Sambhajinagar: लग्नानंतर पतीची भयंकर डिमांड, निकितानं आईला फोन केला अन्… छ. संभाजीनगरात स्मशानभूमीच राडा Dahihandi: दहीहंडीच्या जल्लोषात काळाचा घाला! २ गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, ३०० हून अधिक रुग्णालयात; पाहा कु… YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, पाईपवरून घरात गेला पण…, सोलापुरात भयंकर घडलं, आरोपीला कर्नाटकात पकडलं! News 18 Marathi Headlines | 5 Sept | 9 AM | | Vishakha Raut | Dahi Handi 2026 |
SP News Maregaon

Sachin Tendulkar : ‘मी बाप्पासाठी…’, मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीचं कारण काय? सचिन तेंडूलकरची पहिली प्र…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Ashish Shelar Meet Sachin Tendulkar : टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू आणि क्रिकेटचा देव मानल्या जाणारा सचिन तेंडूलकर सध्या चर्चेत असतो. सचिनने क्रिकेट खेळणं सोडलं असलं तरी त्याची क्रिकेटविषयीची आत्मीयता कमी झाली नाही. अशातच आता राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सचिन तेंडूलकरची भेट घेतली. त्याचं कारण आत्तापर्यंत गुलदस्त्यात होतं. अशातच आता या भेटीनंतर सचिन तेंडूलकरने पहिला प्रतिक्रिया दिली आहे. तर आशिष शेलार यांनी देखील पोस्ट करत माहिती दिली होती.
महान व्यक्तिमत्त्वाशी झालेली भेट
आज ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर यांना भेटण्याचे भाग्य लाभलं. ‘ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन’चे अध्यक्ष म्हणून, मी त्यांना फेडरेशनचे पुस्तक भेट दिलं आणि ‘वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ इथं येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे आशीर्वाद घेण्याचं विशेष निमंत्रण दिलं, असं आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं होतं. खेळाप्रती असलेल्या आपल्या निस्सीम प्रेमातून पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाशी झालेली ही भेट खरोखरच अविस्मरणीय ठरली, असंही ते म्हणाले होते. त्यावर आता सचिन तेंडूलकरने प्रतिक्रिया दिली आहे.

It was a wonderful meeting… Many congratulations on your new role as the President of the Esports Games Federation. Wishing you the absolute best.
I truly enjoyed our conversation today. It’s always special when you can seamlessly shift from talking about family and travel to… https://t.co/QlWgVMwzcI

— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 7, 2026

सचिन तेंडूलकर काय म्हणाला?
ती एक अतिशय छान भेट होती. ‘ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन’च्या अध्यक्षपदी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत सचिनने शेलारांना शुभेच्छा दिल्या. आजची आपली चर्चा मला खूप आवडली. कुटुंब आणि प्रवासाविषयीच्या गप्पांमधून सहजपणे आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या गोष्टी आणि वन्यजीवांविषयीच्या सामायिक आवडीकडे वळणे, हा अनुभव नेहमीच खास असतो. या स्नेहपूर्ण निमंत्रणाबद्दल धन्यवाद; मी बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी उत्सुक आहे, असं म्हणत सचिनने शेलारांचं निमंत्रण स्विकारलं.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर