ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

Ananya Bangar : मुलाची मुलगी झालेली अनन्या बांगर खेळणार ऑस्ट्रेलियात! क्रिकेट बोर्डाने ठेवली ही एकच अट, कोण…

8 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Ananya Bangar Play in Australia : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी आणि क्रिकेटर अनन्या बांगर हिच्यासाठी गुड न्यूज समोर आली आहे. अनन्या बांगर आधी आर्यन बांगर होती. जेंडर-अफॉर्मिंग सर्जरीच्या माध्यमातून ती बाबाची बाई झाली. गेल्या काही दिवसांपासून तिला स्वत:साठी प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. अशातच आता तिला मेहनतीचं फळ मिळालं अन् आता ती ऑस्ट्रेलियात खेळताना दिसणार आहे. अनन्याला ऑस्ट्रेलियामध्ये महिलांच्या सामुदायिक क्रिकेटमध्ये म्हणजेच बीबीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे.
मला वाटलं होतं की मी पुन्हा कधीच…
माझ्यासाठी हा एक खूप मोठा दिवस आहे, विशेषतः हे जाणून की मी क्रिकेट खेळू शकते. एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटले होते की मी पुन्हा कधीच क्रिकेट खेळू शकणार नाही, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार, त्यांनी मला आणखी एक संधी दिली आहे, असं म्हणत अनन्याने भावना व्यक्त केल्या आहेत. अनन्याला ऑस्ट्रेलियामध्ये बीबीएलमध्ये क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली खरी पण तिच्यासाठी एक अट देखील ठेवण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

अनन्याला रक्त तपासणी करावी लागेल
ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर अनन्याला रक्त तपासणी करावी लागेल. अनन्याच्या रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी 10 नॅनोमोल्स प्रति लिटरपेक्षा कमी असेल तरच तिला बीबीएलमध्ये क्रिकेट खेळता येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘एलिट क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर आणि लिंग-विविध खेळाडूंसाठीच्या धोरणा’नुसार, क्रिकेट खेळण्यास पात्र होण्यासाठी खेळाडूच्या रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी किमान 12 महिने प्रति लिटर 10 नॅनोमोलपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
महिलांना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळण्यावर मर्यादा
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये ट्रान्सजेंडर महिला खेळाडूंसाठी सध्या कोणताही स्पष्ट नियम उपलब्ध नाही. दुसरीकडे ICC च्या नियमांनुसार प्युबर्टीनंतर ट्रान्सजेंडर झालेल्या महिलांना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे अनन्या बांगरचं भवितव्य आगामी ऑस्ट्रेलियाच्या बीबीएलवर अवलंबून आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर