ब्रेकिंग न्यूज
शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा ‘दिल्ली दरबारी’ आवाज! 35 लाखाचं फ्रेंडली लोन देणं सराफाला पडलं महागात; पैसे परत मागताच 2 तरुणांचं मोठं कांड CRIME : संभाजीनगरचा डी फार्मसीचा विद्यार्थी अन् 490 अश्लील व्हिडीओ, टेलिग्राम उघडायचा अन्… मोबाईल पाहून प… Neeraj Chopra : वाऱ्यानं घात केला! सिल्वर मेडल जिंकल्यानंतरही नीरज चोप्रा नाराज; पण एका गोष्टीमुळे आनंद गगन… कोसारा नदीला पूर; पुलावर १ ते २ फूट पाणी, यवतमाळ–चंद्रपूर संपर्क खंडित हरित महाराष्ट्रासाठी सरसावले पुणेकर, 10 लाख सीडबॉल्स अन्…, Video पाहाल तर कौतुकच कराल! Ajinkya Rahane Wife : एअरपोर्टवर राधिकाला म्हणाला ‘मी शेवटचं खेळतोय…’, अजिंक्य रहाणेच्या पत्नीची डोळ्यात … यवतमाळला रेड अलर्ट; पुढील ४८ तास अतिवृष्टीचा इशारा बँकेतील नोकरी, हसतं-खेळतं आयुष्य, मोहोळच्या कीर्तीनं राहत्या घरी का संपवली जीवनयात्रा? सोलापूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, एका एकरात केली गुलछडीच्या फुलांची लागवड, वर्षाला लाखात कमाई
SP News Maregaon

Neeraj Chopra : वाऱ्यानं घात केला! सिल्वर मेडल जिंकल्यानंतरही नीरज चोप्रा नाराज; पण एका गोष्टीमुळे आनंद गगन…

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Neeraj Chopra First Reaction after historic CWG : भारताचा ऑलिम्पिक स्टार खेळाडू नीरज चोप्रा याने उत्कृष्ट प्रदर्शन करत सिल्वर मेडल आपल्या नावावर केलं आहे. नीरजने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 85.83 मीटर अंतर गाठत हे पदक निश्चित केलं. त्याचा अंतिम प्रयत्न फाऊल ठरला असला तरी आधीच्या थ्रोच्या जोरावर त्याने उपविजेतेपद मिळवलं. तर श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागे याने 89.75 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह गोल्ड मेडल जिंकलं. सिल्वर मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्रा याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यशवीरचा 85.41 मीटरचा थ्रो
दुसरीकडे, भारताच्या युवा खेळाडू यशवीर सिंगने या स्पर्धेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशवीरने 85.41 मीटरचा थ्रो करत ब्रॉन्झ मेडल पटकावलं. आपल्या 6 व्या आणि शेवटच्या प्रयत्नात यशवीरने ही कामगिरी केली. अँडरसन पीटर्स आणि अर्शद नदीम यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत 24 वर्षांच्या यशवीरने तिसरं स्थान पटकावलं.
भारताचा राष्ट्रगीत वाजतं तेव्हा… – नीरज चोप्रा
जेव्हा पोडियमवर भारताचा राष्ट्रगीत वाजतं तेव्हा मनाला समाधान मिळतं. ती एक वेगळीच फिलिंग असते. पुढे आणखी मोठ्या स्पर्धा आहेत, त्यात नक्कीच आम्ही चांगली कामगिरी करून गोल्ड मेडलसाठी कमबॅक करण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन नीरज चोप्रा याने भारतीयांना दिलं आहे. त्यावेळी त्याने यशवीर कौतुक केलं.

#WATCH | Glasgow, Scotland: Indian athlete Neeraj Chopra says, "It brings back memories of the Asian Games, where Saurav and I both won medals. I’m really happy that Yashvir achieved a personal best at such a crucial moment. It feels great to be on the podium together. It’s… https://t.co/h7p7sdmx5W pic.twitter.com/opHiuKkiHZ
— ANI (@ANI) July 31, 2026

पॉडियमवर एकत्र उभं राहणं ही अभिमानाची गोष्ट
सिल्वर मेडलच्या कामगिरीनंतर बोलताना नीरज चोप्राने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, या विजयामुळे आशियाई खेळांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. या महत्त्वाच्या टप्प्यावर यशवीरने स्वतःची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवल्याचा मला मोठा आनंद आहे. पॉडियमवर एकत्र उभं राहणं ही खूप अभिमानाची गोष्ट असून माझी पुनरागमनाची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.

NEERAJ CHOPRA MOMENT

– Coming back from lots of injuries, crossing 85 meter, winning Silver in Commonwealth Games.

The Greatest Sporting hero of India, Neeraj   pic.twitter.com/rJKBr6EmuN
— Johns. (@CricCrazyJohns) August 1, 2026

पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं काय झालं?
श्रीलंकेच्या 23 वर्षीय रुमेश पथिरागेने दुसऱ्याच प्रयत्नात 89.75 मीटर दूर भाला फेकत सर्वांना थक्क केले. त्याचा हा थ्रो शेवटपर्यंत आघाडीवर राहिला आणि त्याने कारकिर्दीतील पहिले CWG सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅम 2022 चा सुवर्णपदक विजेता आणि पाकिस्तानचा स्टार भालाफेकपटू अर्शद नदीम याला सुरुवातीच्या तीन प्रयत्नांत लय सापडली नाही आणि तो टॉप 8 च्या शर्यतीतून बाहेर पडला.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर