ब्रेकिंग न्यूज
⚡ लंडनमध्ये असल्याचं भासवलं अन् गुपचूप पुण्यात आली, मुग्धा फ्लॅटवर काय करत होती? कुटुंबापासून लपवलं सिक्रेट, … ✦ ⚡ चार महिन्यांची गर्भवती, पती माहेरी भेटायला आला अन् मध्यरात्रीच नको ते घडलं, छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ ✦ ⚡ PM Kisan: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आज खात्यावर जमा होणार 2000 रुपये ✦ ⚡ सतीश चव्हाण हरले, आपलं कसं होणार? काळेंची धडधड वाढली, राष्ट्रवादीत धुसफूस, मराठवाड्यात काय घडतंय? ✦ ⚡ Neeraj Yadav Death : ‘गोल्ड मेडलिस्ट’ नीरज यादव मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! स्कॉर्पिओ कार अन् महिलेची एन्ट… ✦ ⚡ तुरीच्या शेतीत चक्क गांजाची लागवड, छ. संभाजीनगरात मोठी कारवाई, 141 झाडे जप्त ✦ ⚡ प्रवाशाच्या पायातील स्पोर्ट्स शूज बघून आला संशय; सोल कापताच अधिकारीही चक्रावले, पुणे विमानतळावर विचित्र घटन… ✦ ⚡ AUS vs SA : ‘सँडपेपर देऊ का?’, आफ्रिकन फॅन्सने ऑस्ट्रेलियाच्या जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय घडलं? VIDEO ✦ ⚡ दुष्काळाची दाहकता, जनावरांच्या चाऱ्यासाठीही पैसे नाहीत, सोलापूरच्या शेतकऱ्यावर पत्नीचे दागिने गहाण ठेवण्याच… ✦ ⚡ मासिक पाळीचं नाटक, नवरा बाहेर जाताच नवरीने डाव सांधला, कांड पाहून सगळेच चक्रावले
SP News Maregaon

AUS vs SA : ‘सँडपेपर देऊ का?’, आफ्रिकन फॅन्सने ऑस्ट्रेलियाच्या जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय घडलं? VIDEO

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Australia vs South Africa : न्यूलँड केपटाऊनमध्ये सध्या साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात निर्णायक टेस्ट सामना सुरु आहे. हा सामना जिंकन टेस्ट मालिका कोण जिंकतं? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. असे असतान साऊथ आफ्रिकेच्या एका फॅनने ऑस्ट्रेलियाचे जखमेवर मीठ चोळलं आहे. आफ्रिकने फॅनने ‘सँडपेपर देऊ का?’ अशी ऑफर खेळाडूला देऊन त्यांना ट्रोल केले आहे. या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खरं तर 2018 च्या सँडपेपर कांडनंतर ऑस्ट्रेलियन टीम पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर आली आहे. ही घटना केपटाऊन टेस्टमध्येच घडली होती. आणि सध्या साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेला टेस्ट सामना देखील केपटाऊनच्या स्टेडिअमवरच सुरु आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेच्या एका फॅनने सँडपेपरची दाखवून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चिढवलं आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता साऊथ आफ्रिकेचा एक फॅन नथन लियॉनला सँडपेपर ऑफर करताना दिसला आहे.पण लियॉनने ही गोष्ट स्पोर्टींगली घेत मजेशीरपणे टाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर क्रिकेट फॅन्सना 8 वर्ष जूना सँडपेपरच्या घटनेची आठवण झाली.

2018 ला केपटाऊन टेस्टच्या दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बॉल टेम्परिंग करण्यासाठी अर्थात बॉलशी छेडछाड करण्यासाठी सॅडपेपरचा वापर केलेला. या वादानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर 12 महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बॅन केले होते. तर कॅमरून ब्रेनला 9 महिन्यासाठी बॅन केलं होतं.

South African crowd offering sandpaper to Nathan Lyon 😭 https://t.co/zvnRHJ480W
— Pushkar (@Musafirr_hu_yar) October 28, 2026

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर काल साऊथ आफ्रिकेचा डाव 329 वर ऑलआऊट झाला होता.त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने आज सामन्याचा दुसरा दिवस संपेपर्यंत 4 विकेट गमावून 330 धावा केल्या होत्या. सध्या जोश इंग्लीश 85 तर अॅलेक्स कॅरी 51 वर नाबाद खेळतो आहे. ऑस्ट्रेलियाने एका धावाची आघाडी घेतली आहे. आता ही आघाडी तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया किती धावांपर्यंत नेते?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर