ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं!

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : बाबार आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानने दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे. साजिद खानची घातक बॉलिंग आणि अब्दुल्ला शफीकच्या शतकामुळे पाकिस्तानने हा सामना 8 विकेटने जिंकला. दुसऱ्या टेस्टमध्ये मिळालेल्या या विजयासोबतच पाकिस्तानने दोन टेस्ट मॅचची ही सीरिजही 1-1 ने बरोबरीत सोडवली आहे. अब्दुल्ला शफीकला त्याच्या शतकी खेळीबद्दल प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला तर जस्टिन ग्रीव्हसला प्लेयर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.

वेस्ट इंडिजने पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानचा 90 रननी पराभव केला होता, यानंतर पाकिस्तानने जोरदार पुनरागमन केलं. या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 344 रन केले, यानंतर पाकिस्तानने 387 रन केल्यामुळे त्यांना 43 रनची आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजचा दुसऱ्या इनिंगमध्ये 117 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे त्यांना 74 रनची आघाडी मिळाली आणि पाकिस्तानला 75 रनचं आव्हान मिळालं. हे आव्हान पाकिस्तानने 2 विकेट गमावून पार केलं.
साजिद खानची भेदक बॉलिंग
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानचा स्पिनर साजिद खानने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या. दोन्ही इनिंगमध्ये त्याला 4-4 विकेट मिळाल्या. तर अली उस्मानला 6 विकेट घेण्यात यश आलं, त्याने पहिल्या इनिंगमध्ये 2 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्या. या दोघांसमोर वेस्ट इंडिजच्या बॅटिंगने सरेंडर केलं. वेस्ट इंडिजकडून जस्टीन ग्रीव्हसने पहिल्या इनिंगमध्ये 73 रन आणि कर्णधार रॉस्टन चेसने 70 रन केले. दुसऱ्या इनिंगमध्ये कावेम हॉजने सर्वाधिक 34 रन केले.
अब्दुल्ला शफीकचं शतक
पाकिस्तानकडून पहिल्या इनिंगमध्ये अब्दुल्ला शफीकने 160 रनची खेळी केली, तर अझान ओवैसने 55 आणि कर्णधार बाबर आझमने 88 रनची उत्कृष्ट खेळी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये शफीकने नाबाद 24 आणि बाबरनेही नाबाद 24 रन केले. बाबर आझमने सिक्स मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
पॉईंट्स टेबल हललं
पाकिस्तानने वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत. पाकिस्तानची टीम नवव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर वेस्ट इंडिज नवव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. पाकिस्तानची विजयी टक्केवारी 22.22 तर वेस्ट इंडिजची विजयी टक्केवारी 20.83 आहे. 48.150 टक्क्यांसह टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या आणि बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर