ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Rohit Sharma Family Full House : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि स्टार खेळाडू रोहित शर्मा याने छोट्या पडद्यावर डेब्यू केला आहे. रोहित शर्मा आता फक्त वनडे वर्ल्ड कप खेळतो. अशातच आता रोहित शर्मा आयपीएलमध्ये टीम बदलण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून केकेआरमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. अशातच हिटमॅनने त्याच्याच कार्यक्रमात यावर एका शब्दात उत्तर दिलं.
..मग मी सनरायझर्स हैदराबादमध्ये जाणार काय? – रोहित शर्मा
झालं असं की, फॅमिली फुल शो विथ रोहित शर्मा या कार्यक्रमात रोहितचे सगळे जिगरी मित्र उपस्थित होते. यामध्ये श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि अभिषेक नायर देखील होता. अशातच कार्यक्रम सुरू असताना अभिषेक नायरने रोहित शर्माच्या यलो शर्टवरून त्याला डिवचलं. तू यलो शर्ट घातलाय म्हटल्यावर CSK CSK म्हणत सगळ्यांनी त्याचा चिडवलं. त्यानंतर रोहितने सांगितलं की, हा यलो नाही तर मर्टर्ड कलर आहे. आणि माझ्या गाडीचा कलर ऑरेंज आहे म्हणून काय मी सनरायझर्स हैदराबादमध्ये जाणार काय?
रोहितचं हसऱ्या चेहऱ्याने एका शब्दात उत्तर
रोहित शर्माच्या उत्तरावर अभिषेक शर्माने गुगली फेकली. खरं सांगायचं तर, तुला गोल्ड आणि पर्पल जास्त सुट करतो, असा सल्ला अभिषेकने दिला. त्यानंतर प्रेक्षकांनी लगेच विरोध केला अन् मुंबई मुंबई असा नारा दिला. त्यावर रोहित शर्माने हसऱ्या चेहऱ्याने एका शब्दात उत्तर दिलं. फॉरेवर… असं म्हणत रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला सुखद धक्का दिला. त्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून रोहितच्या उत्तराचं कौतुक केलं.

Dosti pakki, roasting bhi pakki
Dekhiye Family Full House with Rohit Sharma, kal raat se, Sat-Sun 9:30 baje, sirf #SonyEntertainmentTelevision aur Sony LIV par.#RohitSharma #FamilyFullHouse #SonyTV pic.twitter.com/GvQaQJltGJ

— sonytv (@SonyTV) September 18, 2026

रोहित शर्माची शेवटची वनडे मालिका?
दरम्यान, कसोटी आणि टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून रोहित आता फक्त एकदिवसीय सामने खेळत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये रोहित शर्मा खेळताना दिसणार आहे. मात्र, रोहित शर्माची ही शेवटची वनडे मालिका असेल का? अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर